परभणी ( प्रतिनिधी( जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद आणि माँ जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. युवा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा या प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या.

या कार्यक्रमाकरीता कविता नावंदे (जिल्हा क्रीडा अधिकारी), नानकसिंग बस्सी (क्रीडा अधिकारी) संजय मुंढे (क्रीडा मार्गदर्शक) रोहन औढेंकर (क्रीडा अधिकारी) रमेश खुणे (वरिष्ठ लिपीक) धनंजय बनसोडे (सचिव बॉक्सींग असो.) प्रदिप लटपटे (जिम्नॅस्टीक असो.) प्रकाश पंडित (बास्केटबॉल असो.) यांची उपस्थीती होती.

कविता नावंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर जिम्नॅस्टीक, बॉक्सींग आणि बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व या स्पर्धेकरीता खेळाडुंनी मोठया उत्साहाने सहभाग नोदवला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता कार्यालयातील धिरज नाईकवाडे, योगेश आदमे, प्रकाश पंडित, विजय जोंधळे, सिध्दार्थ सावंत यांनी परिश्रम घेतले. ( छाया उत्तम बोरसुरीकर)


