परभणी (. प्रतिनिधी) महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन यांच्या मान्यतेने परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशन वतीने सेलू (परभणी) येथे दि. 05 ते 07 मे 2026 दरम्यान 4थी राज्य सिनियर पुरुष महिला लेक्रॉस क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. याकरिता लक्रॉस असोसिएशन ऑफ परभणी वतीने परभणी जिल्हा लक्रॉस पुरुष महिला संघाची निवड चाचणी आयोजन दि.1 मे 2026 रोजी नूतन विद्यालय सेलू जि.परभणी येथे सकाळी: 11 वा करण्यात आले आहे. लेक्रॉस या नाविन्यपूर्ण क्रीडा प्रकार जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे. 2028 वर्षे मध्ये वर्ल्ड कप, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे अशी माहिती राज्य सरचिटणीस मोहम्मद बाबर यांनी दिली. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड,…
Author: Lok Sanchar
परभणी (परभणी) शहरातील गांधी पार्क येथील ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक सूर्यप्रकाश देशपांडे – चांदवडकर (वय 83) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दिनांक 27 रोजी रात्री आठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी दहा वाजता जिंतूर रोडवरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, तीन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. देशपांडे यांना अध्यात्मिक क्षेत्रात मोठी रुची होती.विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतून त्यांनी सेवा बजावताना विविध शैक्षणिक उपक्रम राबवले. जगदीश देशपांडे व पत्रकार प्रवीण देशपांडे यांचे ते वडील होत. देशपांडे कुटुंबीयांवर कोसळलेला दुःख दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे
परभणी,(प्रतिनिधी) : येथील क्रांती चौकातील ज्येष्ठ नागरीक श्रीमती सुनंदा रेणुकादास सरदेशपांडे यांचे आज सोमवार रोजी सायंकाळी 4.50 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. विशाल सरदेशपांडे, विक्रम सरदेशपांडे व सरदेशपांडे हुर्डा पार्टीचे संचालक सचिन सरदेशपांडे ही तीन मुले व स्वप्ना ही मुलगी, सूना व सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान, श्रीमती सरदेशपांडे यांच्या पार्थीवावर मंगळवार 28 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
परभणी ( प्रतिनिधी) स्तनाच्या कर्करोगाबाबत ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने या आजाराचे उशिरा निदान होते. त्यामुळे बºयाच वेळा स्तन काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागते किंवा उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यू होतो. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट परभणीने आधुनिक मेमोग्राफी युनिट सुरू केले आहे. या युनिटच्या माध्यमातून आतापर्यंत परभणी शहरासह ग्रामीण भागातील १३५० महिलांनी तपासणी करून घेतली असून अनेकांना लवकर निदान होऊन उपचार सुरू झाले आहेत. मेमोग्राफी ही स्तनांची विशेष एक्स-रे तपासणी आहे. यात कमी डोसच्या एक्स-रे किरणांचा वापर करून स्तनाच्या ऊतींचे विस्तृत इमेजेस घेतले जातात. या तपासणीद्वारे स्तनातली छोटी गाठ, असामान्य बदल, मायक्रोकॅल्सिफिकेशन किंवा कर्करोगाची…
परभणी,(प्रतिनिधी) परभणी येथील धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित परभणी नर्सिंग कॉलेजने बीएससी नर्सिंग परिक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. आ.डॉ.राहुल पाटील यांच्या धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नर्सींग कॉलेजने मागील काही वर्षापासून परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा सुरू केली आहे. यंदा झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. याबद्दल आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.एस.आरती यांनी देखील महाविद्यालयाच्या यशाचे श्रेय विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिले आहे. भविष्यातही अशीच यशस्वी परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच…
परभणी,( परभणी) पिक विम्याची रक्कम 15 दिवसात मिळाली पाहीजे अन्यथा आंदोलन करु असा इशारा आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिला आहे.कोरड्या अवस्थेतील पिक कापणी प्रयोगाचा अहवाल कंपनीला तातडीने देऊन कारवाई करा अशा सुचना आ.पाटील यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना केल्या आहेत. परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, संबंधित पिक विमा कंपनीने शासनाच्या काही पीक कापणी धोरणाचा गैरफायदा उचलला आहे. पीक कापणी प्रयोग करताना 2025 मध्ये सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात पाऊस असल्याने जमिनीत पाणी होते, पिकेही ओली होती, यामुळे शासनाने ओल्या पिकांसोबतच कोरड्या पिकांचे…
परभणी, (प्रतिनिधी) परभणी पाथरी रस्त्यावरील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे नुकतेच अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर व मराठवाड्यातील पहिले स्पाइनल डिकॉम्प्रेशन युनिटचे उद्घाटन महाविद्यालयाचे संस्थापक आ. डॉ राहुल पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी, डॉ विवेक नावंदर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी रामराव डोंगरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. राहुल पाटील म्हणाले की,या अत्याधुनिक सुविधेच्या माध्यमातून परभणी व मराठवाडा विभागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील असे सांगितले. डॉ. प्रमोद शिंदे यांनी या नव्या सुविधेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, स्पाइनल डिकॉम्प्रेशन युनिट हे मराठवाड्यातील पहिले…
व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी जाहीर परभणी,(प्रतिनिधी) पत्रकारांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची परभणी जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून बालासाहेब काळे आणि गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अवघ्या पाच वर्षात जगातील तब्बल 78 देशात विस्तारलेल्या या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी राज्याचे कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या उपस्थित बुधवार (दि.15) परभणीत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्याचे सहसरचिटणीस सुरज कदम यांनी काम पाहिले. यावेळी राज्य सहसंघटक विजय पाटील,मराठवाडा कार्यकारीणी सदस्य विशाल माने,…
परभणी ( प्रतिनिधी) भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 135 व्या जयंतीनिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 09:00 वाजता करण्यात आले होते. सुरुवातीस डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार जिल्हाध्यक्ष डॉ. एम. एम. भरणे, जिल्हाधिकारी संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते अर्पन करुन पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीने आनंदा भेरजे यांनी मानवंदना दिली. भिक्कु संघाच्या वतीने भंते पि. धम्मानंदजी यांनी ञिसरण पंचशील दिले. कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धबाले, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण , आमदार राहुल पाटील महापौर सय्यद इकबाल यांच्यासह जेष्ठ नेते बी. एच. सहजराव, व्ही.…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्याचे भूमीपुत्र रामराव वडकुते यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल परभणीकरांच्या वतीने येत्या रविवारी 12 एप्रिल रोजी परभणीत भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नागरी सत्कार समितीच्या पदाधिकार्यांनी शनिवार 4 एप्रिल रोजी एका पत्रकार परिषदेतून दिली. माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, अॅड. स्वराजसिंह परिहार, किर्तीकुमार बुरांडे, राजेंद्र वडकर यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी शनिवारी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेतून खासदार वडकुते यांची राज्य सभेवरील निवड ही परभणीकरांच्या दृष्टीने सार्थ अभिमानाची बाब आहे, असे नमूद केले. आपल्या माणसाचा आपल्याच माणसांनी गौरव केला पाहिजे, या भावनेतून समस्त परभणीकरांच्या वतीने 12 एप्रिल रोजी रविवारी एमआयडीसीतील हॉली डे फन पार्कच्या…

