Author: Lok Sanchar

परभणी, (प्रतिनिधी) – शासन सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित अडचणी वेळेत व संवेदनशीलतेने सोडविल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम बनेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार विभागातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालय स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्या कर्मचारी समाधान शिबिराअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे होते. यावेळी निवासी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण, तहसीलदार रामदास कोलगणे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, शासकीय कर्मचारी हे प्रशासनाचा महत्त्वाचा कणा…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) युवा सेनेच्या वतीने राज्यस्तरीय ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, युवकांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 7 जून रोजी सकाळी 11 वाजता पाथरी रस्त्यावरील परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी हॉस्पिटल येथे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे अशी माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. स्पर्धेमध्ये 18 ते 35 वयोगटातील विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांना सहभागाची संधी देण्यात आली आहे. स्पर्धा विभागीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा टप्प्यांत पार पडणार आहे. विभागीय केंद्रांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि कोल्हापूर नांदेड या ठिकाणांचा समावेश आहे. स्पर्धेच्या तारखांनुसार 7 जून रोजी जिल्हास्तरीय,१०…

Read More

परभणी |(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने आज शहरातील सिटी पॅलेस येथे “मोदी सरकारची १२ वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण” अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मराठवाडा संयोजक श्री. नितीन काळे व युवा नेते श्री. राहुल लोणीकर यांची उपस्थिती होती. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भुमरे, गटनेते श्री. मुकिंद खिल्लारे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश देशमुख, नगरसेवक डॉ. केदार खटिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. भागवत कराड, श्री. नितीन काळे व श्री. राहुल लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर विवेक नावंदर शिवसेना शिंदे गटाचे सईद खान व अपक्ष सुशील सुरेशदादा देशमुख यांच्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वच लक्ष लागले आहे परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 7 इच्छुकांनी 10 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या मतदारसंघातून सुशीलकुमार सुरेशराव देशमुख यांनी दोन, विवेक पांडुरंग नावंदर यांनी शिवसेना उबाठा गटाकडून दोन तर सईद खान शेरगुल खान पठाण यांनी शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त मेहराज…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांनी सोमवारी (दि.01) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, महानगर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, महापौर सय्यद इकबाल, सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. विवेक नावंदर यांनी उमेदवारीची संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मतदारसंघातील मान्यवरांचे…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज आज शिवसेनेचे मंत्री तथा प्रवक्ते संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना सईद खान हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचे डिपॉझिट जप्त करतील, असा दावा शिवसेनेचे मंत्री तथा प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केला. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सईद खान यांनी सोमवारी (दि.01) जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे नेते मंत्री शिरसाठ, राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार संतोष बांगर, माजी आमदार सुरेश वरपुडकर, विधान परिषद सदस्य हेमंत पाटील, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी खासदार सुरेश जाधव, नगराध्यक्ष मिलींद सावंत,…

Read More

परभणी, ( प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द व बोबडे टाकळी येथे सोमवारी झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी मंगळवार दिनांक 26 मे रोजी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत या वादळात शेतातील पॉलिहाऊस, फळबागा, जनावरांचा चारा, जनावरांचे गोठे व शेड, सोलर पंप तसेच विद्युत पोल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच डिझेल-पेट्रोल टंचाई, खत-बियाण्यांच्या वाढत्या किमती आणि शेतीतील आर्थिक अडचणींमुळे शेतकरी अडचणीत असताना या नैसर्गिक आपत्तीने “दुष्काळात तेरावा महिना” अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ.राहुल पाटील यांनी…

Read More

सोनपेठ, (प्रतिनिधी) देशात वाढती महागाईने कहर केला असून शेती मालाला भाव नाहीत, शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक हे विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस परभणीचे निष्ठावंत आमदार डॉ राहुल पाटील यांनी व्यक्त केला. तसेच परभणी जिल्हा भगवामय करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. त्यानिमित्ताने विटा ता. सोनपेठ येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा अधिक मासा निमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 17 रोजी पार पडला यावेळी आमदार डॉ राहुल पाटील बोलत होते. यावेळी…

Read More

परभणी (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत चिंताजनक कल समोर आला आहे. पूर्वी केवळ ६०-७० वर्षांच्या व्यक्तींमध्ये आढळणारा हृदयविकार आता चाळीशीतच तरुणांना गाठत आहे. सिद्धार्थ शुक्ला, पुनीत राजकुमार आणि गायक केके यांसारख्या फिट सेलिब्रिटींच्या अकस्मात निधनाने हा धोका अधिक स्पष्ट झाला आहे.या पार्श्वभूमीवर, आ.डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणीतील आर.पी. हॉस्पिटलने अवघ्या ३०० रुपयांत TMT (ट्रेडमिल टेस्ट) उपलब्ध करून दिली आहे. ‘कार्डिओ मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट’च्या आकडेवारीनुसार, हृदयविकाराच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. बदलेली जीवनशैली, कामाचा ताण, अपुरी झोप, जंक फूड आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकदा वरून तंदुरुस्त दिसणाऱ्या व्यक्तींनाही अचानक हृदयविकाराचा झटका येतो. याचे मुख्य कारण म्हणजे…

Read More

परभणी (प्रतिनिधी) पोलीस स्टेशन नानलपेठ यांच्या हद्दीत बेवारस स्थितीत मिळून आलेल्या व डिटेन करण्यात आलेल्या एकूण २४ दुचाकी मोटारसायकल वाहनांच्या जाहीर लिलावास तालुका दंडाधिकारी, तहसील कार्यालय परभणी यांच्याकडून परवानगी प्राप्त झाली आहे. सदर बेवारस दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव तालुका दंडाधिकारी परभणी, उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने नागरिकांना कळविण्यात येते की, सदर वाहनांचा जाहीर लिलाव दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस स्टेशन नानलपेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. *-*-*-*-*

Read More