परभणी(प्रतिनिधी) : सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे प.पु. गुरुदेव श्री. वचन माऊली यांच्या प्रेरणेने येथील जिंतूर रस्त्यावरील टाकळी कुंभकर्ण (ता.जि.परभणी) येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर रविवारी 9 फेबु्रवारी रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत संत-महंत व ब्रह्मवृंदांसह यजमान व हजारो भावीकांच्या साक्षीने धार्मिक विधींसह मंत्रोच्चारात 3105 कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न झाला.
या महागायत्री महायज्ञ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.08) धार्मिक विधींसह देवता स्थापना करण्यात आली. त्यावेळी पुण्यवाचन व अग्निचीही स्थापना करण्यात आली. यावेळी सुशील देशमुख, समशेर वरपुडकर, भगिरथ बद्दर, व्यंकटेश कुरुंदकर यांच्यासह अन्य मुख्य यजमान होते.
रविवारी सकाळी 8 वाजता या महायज्ञ भूमीत सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे प.पु. गुरुदेव श्री वचन माऊली यांच्या प्रेरणेने, पुढाकारातून संत-महंतांसह 3105 यजमान व हजारो भाविकांच्या साक्षीने 3105 कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला.

या सोहळ्याची संपूर्णाहुती श्री गायत्री यज्ञ विधींचे पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न प्र.य. नित्रुडकर गुरुजी, प.पु. श्री. सुरेश महाराज उटीकर, हभप माधवबुवा आजेगांवकर यांच्यासह अन्य ब्रम्हवृंदांच्या साक्षीने या महायज्ञ सोहळास्थानी गायत्री मंत्राच्या स्वाहाकाराने महायज्ञास प्रारंभ झाला. धार्मिक विधींसह ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात सुमारे दोन तास चाललेल्या या सोहळ्यात सपत्नीक यजमानांनी यज्ञ आहुती दिली.
या महागायत्री महायज्ञ सोहळ्यानंतर सकाळी 10 ते 10.30 या वेळेत संत पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी श्री 1008 वेदांतचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरीजी, श्री महामंडलेश्वर 1008 स्वामी हरिश्चंद्र महाराज, श्री 1008 आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, प.पु. श्री. स्वामी सच्चिदानंद सरस्वती महाराज, श्री नरेंद्रदास त्यागी महाराज, प.पु. श्री मकरंद महाराज, हभप माधवराव आजेगांवकर, वेदशास्त्रसंपन्न भागवताचार्य श्री बाळुगुरु असोलेकर, वेदशास्त्रसंपन्न वेदांतभास्कर प्रमोदशास्त्री कुलकर्णी, वेदशास्त्रसंपन्न उमेश महाराज टाकळीकर, श्री 1008 महेशानंद पुरीजी महाराज, हभप श्री नामदेव महाराज ढवळे चारठाणकर, महंत श्री दत्ता महाराज, श्री शंकर बापू, श्री शिवाजी महाराज राऊत, हभप अच्युत महाराज दस्तापुरकर, श्री रमेश महाराज शर्मा, महंत महादभारती गुरुज्ञान भारती आनंदी महाराज, हभप पंडीत महाराज डाके, हभप राम महाराज काजळे, हभप पुरुषोत्तम महाराज, प.पु. सुरेश महाराज उटीकर, प.पु. स्वामी अच्युतानंद महाराज आदी सहभागी होते. यावेळी महाप्रसादाने या सोहळ्याचा समारोप झाला.
दरम्यान, या यज्ञ सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता सर्वात्मक गुरुदेव परिवार, महागायत्री यज्ञ समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, रामेश्वरजी ओझा (हैद्राबाद), आनंद भरोसे, भगवानराव वाघमारे, अॅड. न.चि. जाधव, भागवत खोडके, अॅड. रमेशराव दुधाटे गोळेगांवकर, विजय उर्फ बंडू सराफ, हभप बाळासाहेब मोहिते, अॅड. ओंकार शिंदे, राजकुमार भांबरे, रमाकांत कुलकर्णी, प्रा. रामभाऊ घाडगे, प्रदीप कुलकर्णी, हभप संतोष खिल्लारे, भगिरथ बद्दर, रविकिरण गंभीरे,सुशिल देशमुख, पंढरीनाथ घुले, मयुर पोले, शांताताई जैन उखळदकर, सुप्रिया कुलकर्णी, अॅड. लीना चिलवंत, बालासाहेब चौधरी, मल्हारीकांत देशमुख, दत्तराव दैठणकर, अॅड. किरण दैठणकर, अशोक चव्हाण भाई देवडे,बाळासाहेब संमिद्रे,यांच्यासह टाकळी कुंभकर्णी येथील ज्येष्ठ मंडळींसह शेकडो ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


