परभणी(प्रतिनिधी) – पेडगाव रोड येथील सुजाता नगर बुद्ध विहार परभणी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघाची धम्मदेशना व विपश्यना कार्यक्रम अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झाला.
पाच दिवसीय परभणी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाचे सुजाता नगरात श्रद्धावान बौद्ध उपासकांनी पुष्पवृष्टी करून श्रद्धा भावाने पवित्र भिक्खू संघाचे स्वागत केले. अंगणी सडा, रांगोळी, शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक स्वागतासाठी सज्ज होते.

आंतरराष्ट्रीय विपशनाचार्य तथा म्यानमारचे पूजनीय भंतेजी डॉ. अशीन उत्तमतारा सयाडो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमेरिका, स्वित्झर्लंड, म्यानमार, थायलंड येथील पूजनीय भिक्खू यांचा समावेश भिक्खू संघामध्ये होता.उपस्थित उपासकांना पूजनीय भिक्खु संघाने त्रिसरण व पंचशील दिले. मार्गदर्शना बरोबरच विपश्यना वर्ग ही घेण्यात आला. यावेळी पूजनीय भंतेजी डॉ. अशीन उत्तमतारा सयाडो
यांनी धम्मदेशना दिली.
पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचा अनुवाद भंते सुगत शांतेय यांनी केले. धम्मदेसनेत त्यांनी सांगितले की, ध्यान साधना ही मानवासाठी अत्यंत गरजेची आहे व दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक आहे. विपश्यना ही तथागत भगवान बुद्धांनी जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. धम्माची चळवळ गतिमान करणारे भिक्खू यांना वृद्धकाळात अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो . करिता भिख्खू निवास व विपश्यना केंद्राची गरज असते. समाजाने त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक उपासकांचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले. सदरील कार्यक्रमाचे निमंत्रक भीमराव वायवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन सुजाता नगर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा धम्म देसना व विपश्यना कार्यक्रम सुजाता नगरचे आयोजक नेते आयु. गौतम मुंडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी टी प्रधान, भगवानराव जगताप, अरविंद भक्ते, दशरथ तूपसुंदर, कैलास रगडे, दशरथ झिंजाडे, रामराव तलवार, भानुदास साबळे, सखाराम जोंधळे, गौतम साळवे, माधव मालसमिंदर, भीमराव प्रधान, भीमराव वाघमारे, बालासाहेब शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
सुजाता महिला मंडळ यांनी याचना घेतली. सरणातयाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
बहुसंख्येने परिसरातील उपासक-उपासिकांची यावेळी उपस्थिती होती.


