परभणी (प्रतिनिधी) शहरातील महाशिवरात्रीनिमित्त आज दिनांक 26 रोजी बुधवारी शहरातील सर्व शिवमंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली.
शहरातील प्रसिद्ध पारदेश्वर मंदिर येथे आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सकाळी अभिषेक, महाआरती नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती
तर दुसरीकडे शहरातील बेलेश्वर महादेव मंदिरात देखील भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या महाशिवरात्रीनिमित्त शहरात विविध महादेव मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे तर विष्णुनगर येथे महेश्वर मंदिरात देखील भाविकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे ( छाया उत्तम बोरसुरीकर)


