गंगाखेड ( प्रतिनिधी) येथील परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा दिनांक 29 रोजी भगवान परशुरामाचा जन्मदिनानिमित्त काढण्यात आली होती या शोभायात्रेत सजीव देखावे आकर्षक लाइटिंग आकर्षक ढोल ताशाचा गजर, टाळ मृदंगाचा खणखणाट, फटाक्यांची आतिषबाजी, भगवान परशुरामाच्या जयघोषाने संपूर्ण गंगाखेड परिसर दनाणला होता.
दिनांक 29 रोजी भगवान परशुराम यांची जयंती अर्थात जन्मदिन होता त्यानिमित्ताने गंगाखेड शहरांमध्ये भव्य दिव्य अशी शोभायात्रा संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हजारो भाविकांच्या सहभागाने शोभायात्रेचा आरंभ ह भ प माणिक महाराज नाव्हेकर, ह भ प केशव महाराज पालमकर, वेद संपन्न अशोक पाठक, नारायण गुरु जोशी, दिलीप गुरु पाठक यांच्या हस्ते भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करून शोभा यात्रेस प्रारंभ झाला, शोभा यात्रेच्या अग्रगण्य भागी ढोल ताशा बँड पथक, शेकडो पुरुष रांगा, संत जनाबाई महिला भजनी मंडळ हटकर गल्ली, शारदीय महिलाभजनी मंडळ वैष्णव गल्ली, कृष्णाई महिला भजनी मंडळ लेक्चर कॉलनी, त्यानंतर शेकडो महिलांचा रांगा, सजीव देखावा रथ, प्रकाशमय छत्री धारक, आणि भव्य भगवान परशुरामाच्या पुतळ्याची प्रतिमा ठेवलेला दिव्य रथ, शोभायात्रा कुंदेश्वर मंदिर पाठक गल्ली पासून पोस्ट ऑफिस मार्गे मुख्य बाजारपेठेतून भगवती मंदिर पर्यंत पोहनचली यावेळी शिवाजी चौकात श्री भगवती मातेची व श्री भगवान परशुरामाची आरती करून त्या ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
तेथून श्रीराम चौक येथे यात्रा पोहोचल्यानंतर भजनी मंडळाने आपले विविध अभंग भारुडे सादर करत महिला भक्तांनी फुगड्या खेळत भगवान परशुरामाचा जयघोष केला. तेथून यात शोभायात्रा संत जनाबाई मंदिर मार्गाने राजेश्वर फंक्शन हॉल येथे पोहोचली. या ठिकाणी परमपूज्य रामचंद्र महाराज टाकळकर, ह भ प दिलीप महाराज इसादकर, भागवत कार ह भ प भगवान देव पडेगावकर, वेद संपन्न नारायण गुरु जोशी, अशोक काका पाठक यांचा समस्त ब्रह्मवृंदांच्या वतीने समितीने सत्कार केला. यावेळी सर्व संत म्हणतांनी उपस्थित भाविक भक्तांना परशुराम जयंतीनिमित्त आशीर्वाचन दिले.
या शोभा यात्रेची वैशिष्ट्ये म्हणजे शोभायात्रा केवळ ब्राह्मण समाज नव्हे सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते त्यामध्ये, विष्णू मुरकुटे, श्रीकांत भोसले, उमाकांत कोल्हे, संतोष तापडिया,पंडितराव चौधरी, नंदकुमार पटेल,राधाकिशन शिंदे, वैजनाथ टोले, डॉ. हेमंत मुंडे, सुनील चौधरी,एडवोकेट अवचार, आळनुरे, पिराजी कांबळे, संदीप राठोड, लाला आणावडे, नितीन चौधरी,नंदकुमार सोमानी, मकरंद चिनके अरविंद चक्रवार, गजानन महाजन, जितेश गोरे, श्याम उदावंत यांच्यासह अन्य नागरिक सहभागी होते. श्रीधराचार्य जोशी यांनी सजीवरुपी भगवान परशुरामाचा वेश परिधान करून सर्वांना शुभेच्छा देत होते. तसेच सजीव झाकी बनवण्यासाठी राणी राखे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली या मध्ये महादेवाची भूमिका ओम गीते, विष्णूच्या भूमिकेत श्लोक कोणार्डे,कृष्णा चे भूमिकेत गौरव कुलकर्णी, तर राधेच्या भूमिकेत गार्गी कुलकर्णी, श्री रामाच्या भूमिके त अद्वैत देवळे, सीतेच्या भूमिकेत आर्या जोशी यांनी भूमिका सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेवटी महाप्रसादाने सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम कासांडे श्रीराम कुलकर्णी दिनकर नावेकर यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले