परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे, आपला विकास साधावा आणि सर्व स्वप्न साकार करावी. पालकांनी देखील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात पुढे जावा, टिकावा यासाठी प्रयत्न करावेत व विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे अभ्यासक्रमाची निवड करू द्यावी.विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात वेळेचा सदुपयोग करून सोशल मिडियातील विचलित करणाऱ्या मोहापासून दूर राहण्याचे तसेच शिस्तीचे पालन करून जीवन समृद्ध करावे.* असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी केले.

बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थचे अध्यक्ष माननीय डॉ. एन. ए. झरकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर या उपस्थित होत्या.कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी मा. गजानन वाघमारे, विस्तार अधिकारी मा. गोविंद मोरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा.डॉ.विवेक नावंदर, संस्थेचे उपाध्यक्ष मा.ॲड.विलास पोहंडुळकर, सहसचिव ॲड.संजय देशपांडे, कोषाध्यक्ष मा.विनय नावंदर,संस्था सदस्य मा.पवनकुमार झांजरी, मा.मल्हार विहीटकर, मा.सौ.अनिता विवेकजी नावंदर,
प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, पर्यवेक्षक प्रदीप रुघे , बळीराम कोपरटकर बाल विद्याविहारचे प्रमुख विनायक लोखंडे,बाल विद्या वर्धिनीचे रमेश कापसे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना नतिशा माथुर म्हणाल्या की, *विद्यार्थ्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेळप्रसंगी कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. श्रम , कष्ट , मेहनत याच्या बळावरच यश प्राप्त होऊ शकते. स्वप्न मोठी पहा, पण ती पूर्ण करण्यासाठी तेवढीच मेहनत करायला शिका.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर म्हणाले की, *उत्तम नियोजन , प्रत्यक्ष अंमलबजावणी व सक्षम कार्यक्षमता या बळावर संस्थेने आजपर्यंतचे यश प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या या यशस्वीतेचा आलेख पुढे नेला पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही होऊन ज्ञान संपादन करावे. व आई-वडिलांसह प्रशालेचा नावलौकिक वाढवला पाहिजे.असे प्रतिपादन करून संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचा वृत्तांत मांडला.
उपशिक्षणाधिकारी मा. गजानन वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी अनुकरणातून शिकावे आणि उच्चपदस्थ अधिकारी, यशस्वी व्यक्ती, उद्योजक यांच्याकडे पाहून त्यांच्या अनुभवातून त्यांच्या वागणुकीतून,त्यांच्या यशस्वीतेतून आपण त्यांचं अनुकरण करावं आणि आपला सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन केले*
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या सर्व शाखातील पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक, एन. एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी परीक्षेत९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ९०% व त्यापेक्षा अधिक गुण घेणारे एकूण १४० विद्यार्थी व विशेष प्राविण्य प्राप्त करणारे एकूण ३०७विद्यार्थी, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे ८७ व द्वितीय श्रेणी ४९ ,पास श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बाल विद्यामंदिर प्रशाला व बाल विद्याविहार प्रशालेतील वर्ग पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.त्यांचाही सत्कार करण्यात आला.
तर प्रशालेचे एन.एम. एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये २१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
तर सी.सी.आर.टी. शिष्यवृत्तीसाठी ०४ विद्यार्थी पात्र ठरले.
याप्रसंगी उपाध्यक्ष मा.ॲड.विलास पोहंडुळकर यांनी मनोगत व्यक्त केले.व त्यांनी यशस्वी गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, व शिक्षक यांचे अभिनंदन केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी प्रास्ताविक केले. यामधून त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व संस्थेच्या विकासाचा अहवाल सांगत विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा ,संगीत चित्रकला सर्वच क्षेत्रात विद्यार्थी सहभाग नोंदवतात असे सांगत इयत्ता दहावीच्या निकालाचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले.


