परभणी (प्रतिनिधी) तुम्ही ऊस गाळपाची चिंता करू नका, कोणत्याही परिस्थितीत एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपा विना शिल्लक राहणार नाही याची हमी मी देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करा असे आवाहन आमदार डॉ.राहुल पाटील यांनी झरी येथे केले
श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स कारखान्याच्या वतीने झरी ता परभणी येथे मंगळवारी ‘ऊस लागवड शेतकरी मेळावा पार पडला यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
कारखाना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही यावेळी शेतकरी बांधवांशी चर्चा केली.यावेळी बोलताना आमदार डॉ पाटील म्हणाले,शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्वजण उभे आहोत! उसाचं एक टिपरूदेखील शिल्लक राहणार नाही, अशी यंत्रणा राबवू,लोअर दुधना नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे ऊस लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे.
उसाची काळजी न करता आपलं उत्पादन कसं वाढेल, याची काळजी घ्या! आम्ही तुमची काळजी दूर करू असं आवाहन यावेळी बोलताना केलं.
यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने जनरल मॅनेजर सुभाष सोलव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ऊस कोणत्या पद्धतीने लागवड करायचा आधीक उत्पादन कसे वाढेल याची माहिती दिली तसेच परभणी तालुक्यात ठीक ठिकाणी कारखान्याची यंत्रणा कार्यरत केली असून थेट शेतात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी
जेष्ठ संचालक न. चि. जाधव, जनरल मॅनेजर सुभाष सोलव, मुख्य शेतकी अधिकारी तुळशीराम अंभोरे, अधिकारी गंगाधर शिरपूरकर,संदीप झाडे,बंडू बिडकर, समर्थ अवचार, विनायक पवार, मा.जिल्हा परीषद सदस्य अर्चनाताई गजाननराव देशमुख, माजी सरपंच गंगाधरराव मोरे, भास्करराव देवडे, सोपानराव आळमर, अशोकराव घुले, दिपकराव देशमुख, सुदामराव सोनवणे,पप्पू जाधव, बम्हानंद सावंत, किशोर देशमुख, सुरेश देशमुख,प्रल्हाद देवडे,विशाल देशमुख, किरण देशमुख, आबासाहेब चौधरी, शक्ती सावंत, संतोष देशमुख, योगेश शिरडकर, परमेश्वर चट्टे, बाळासाहेब जगाडे, अभिजित देशमुख, पुश्पक देशमुख, बाळासाहेब देशमुख, दत्तराव जगाडे, किशोर देशमुख, शिवाजी देशमुख व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


