परभणी (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालय , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या द्वारे विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन बी रघुनाथ सभागृह परभणी येथे उत्साहात संपन्न.
या प्रसंगी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य युवा पुरस्कारार्थी काजल भुसारे , प्रा. डॉ सुरेश शेळके , डॉ. सुरेश हिवाळे डॉ.संतोष वाकडे डॉ. श्रीकांत पेंडलवार, मिलिंद बामणीकर, श्रीमती सुनंदा दिगोलकर डॉ. पंकज खेडकर , रविकुमार पंडित श्रीमती लक्ष्मी लहाने अब्दुल कुरेशी श्रीमती भाग्यश्री जोशी श्रीमती पुनम मारवा श्रीमती सरोज देशपांडे आदि उपस्थित होते.
विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत
समूह लोकनृत्य व लोकगीत , अंतर्गत चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व कौशल्य विकास स्पर्धा कविता वाचन, कथालेखन, तर संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना, इत्यादी विविध प्रकारात स्पर्धा संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी केले. देशाचं युवा धोरण पॉलिसी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने 2012 ला तयार केली, युवा धोरण ठरवनारे आपले राज्य प्रथम याचा सार्थ अभिमान , यानिमित्त अनेक कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळते सांस्कृतिक कौशल्य विकास संकल्पना आधारित सायन्स क्षेत्रातील नाव संकल्पना या मध्ये 15 ते 29 वर्ष वयोगटातील मुलांना या ठिकाणी सहभाग नोंदवता येतो राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात उत्साहाने हा महोत्सव साजरा केला जातो युवा महोत्सवाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले त्यांनी सहभागी युवांना प्रोत्साहन देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
परभणी जिल्ह्याला खूप मोठा सांस्कृतिक कार्याचा वारसा आहे देश विदेश पातळीवर येथील कलाकाराची सादरीकरण झालेले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये कलाकारांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आणि कलाकार या मातीतून तयार होत आहे अशा पद्धतीचा व्यासपीठ निर्माण करून दिले जात आहेत. अनेक दिग्गज कलाकारांचा अशा स्पर्धेत सहभाग पाहून स्पर्धकांना योग्य न्याय व उज्वल भविष्य मिळेल यात शंका नाही असे समाधान व्यक्त केले. आपला देश विविध कलागुणांनी संस्कृतीने नटलेला आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळतो ही एक उल्लेखनीय संस्कृती जतन करणारी बाब आहे. मिळालेल्या संधीचं कलाकारांनी सोनं करावं याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्व मान्यवरांचे, परीक्षकाचे स्वागत करण्यात आले. तसेच एमपीएससी द्वारे श्री कल्याण पोले यांचे तालुका क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती झाल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांचे द्वारे अभिनंदन करण्यात आले.
या स्पर्धे अंतर्गत विविध स्टॉल लावण्यात आले होते त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते . विभागीय युवा महोत्सवासाठी सूत्र संचालन श्री अतुल वैराट यांनी आपल्या भारदस्त आवाजात युवकांचे मने जिंकत केले.
मा. जिल्हाधिकारी यांनी अनेक स्पर्धांचा लोकगीत व लोकनृत्य यांचे सादरीकरण पाहिले व सायन्स विज्ञान याबाबतीत इनोवेशन प्रदर्शन चित्रकला कथालेखन कविता लेखन या सर्व समूहांना प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केली, कलाकारांचे कौतुक केले कार्यक्रमा रंगात आल्यानंतर मुळातच सांस्कृतिक व कला व क्रीडा क्षेत्राची आवड असणाऱ्या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी व यांच्या कार्यालयीन स्टाफ व उपस्थित सर्व कलाकार यांनी जालना जिल्ह्याचे सादरीकरण सुरू असताना लोकगीतावर ताल धरला मुळातच कला गुणांचे आवड असल्याने श्रीमती कविता नावंदे या स्वतःला कार्यक्रम दरम्यान संगीताच्या तालावर ताल धरण्यास रोखू शकले नाहीत. अतिशय आनंदी व उत्साही वातावरणामध्ये सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या. दिनांक 12 डिसेंबर रोजी नांदेड येथील राज्य युवा महोत्सवासाठी हे सर्व कलाकार सहभागी होणार आहेत.

या सर्वांना पुढील स्पर्धेसाठी अभिनंदन करून कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ सोहळा साजरा करण्यात आला सर्व विजेते खेळाडूंना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील सूचना देण्यात आले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील नानकसिंग बस्सी, मुंडे, कल्याण पोले, रोहन औंढेकर, सुरेश नाटकर, रमेश खुणे भागवत, प्रकाश पंडित, धीरज नाईकवाडे , योगेश आदमे कार्यालयातील इतर स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
(छाया उत्तम बोरसुरीकर)


