परभणी (प्रतिनिधी) शहरातील विद्यानगर भागातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंतीनिमित्त दिनांक 11 डिसेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता संपूर्ण 18 अध्याय श्रीमद् भगवद्गीता पठनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा ह्या आयोजनाचे पाचवे वर्ष असून प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या या उत्सवात शेकडो महिला पुरुष भाविकांची उपस्थिती असते. याही वर्षी जास्तीत जास्त भाविकांनी गीता जयंतीनिमित्त गीता पठणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आयोजन आयोजक प्रफुल्ल चामणीकर, सुहास बिडकर, अरुण कुमार पेडगावकर, शंकर आजेगावकर आदींनी केले आहे.


