परभणी (प्रतिनिधी) आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन शनिवारी दि 15 रोजी करण्यात आले. काल कृषी मंत्री यांनी एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिली असे विधान केले. शेतकऱ्यांची तुलना भिकऱ्या बरोबर करणाऱ्या कृषी मंत्र्याचा जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी एकीकडे लोकसभेच्या दारुण पराभवानंतर महायुतीची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी वाटेल त्या योजनांचा पाऊस या सरकारने पाडला त्यात एक रुपया पिक विमा, संपुर्ण कर्ज मुक्ती, शक्तीपीठ रद्द, लाडकी बहिणी योजना अशा असंख्य योजनांचे आमिष दाखवून महायुती ची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न यांनी केला त्यात ते यशस्वी झाले. महाराष्ट्रातील जनता त्यात मोठ्या संख्येने असलेला शेतकरी वर्ग यांचे मत मिळवली आणि आता सत्येत बसल्या नंतर यांचे खरे रूप जनतेसमोर यायला लागले आहे. पीक विम्यात घोटाळा प्रकरणी सगळ्यात मोठा घोटाळा बीड जिल्ह्यातला आहे. यात यांच्या पक्षाचे लोक यात शामिल आहेत.
तरी अद्याप यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. चोर चोर मावस भाऊ अर्ध अर्ध वाटुन खाऊ अशी यांची भूमिका आणि हे शेतकऱ्यांना लाचार, भिकारी म्हणणार हे जर असे मूर्खा सारखे विधान करतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. हे ह्यांनी लक्ष्यात ठेवावे असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजा लोडे, राजपाल देशमुख, सचिन दुगाने, माऊली दुधाटे, व्यंकटी पवार, आदी उपस्थित होते.


