पालम (प्रतिनिधी) माधवराव पाटील महाविद्यालय पालम येथे संत सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. टी सातपुते सर होते. प्रमुख पाहुणे उप प्राचार्य प्रा. डॉ. आत्माराम अरसुळे आणि प्रा.डॉ.बी. एस. पवार व प्रा. डॉ.एस.जि.चव्हाण सर तसेच एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा.डॉ. गोवर्धन उरकुडे यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. बी. एस. पवार यांनी बंजारा संस्कृती, संत सेवालाल महाराजाचा परिचय, सेवालाल महाराजांची शिकवण, विज्ञानवादी सेवालाल महाराज, रुढी परंपरा यांची जोड देऊन वर्तमान काळामध्ये त्यांच्या विचाराची उपयुक्तता या संदर्भाने मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य सातपुते सरांनी सेवालाल महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण विषयक विचार याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. संगीता रणवीरकर यांनी मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.


