परभणी,(प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून,छत्रपती संभाजी महाराजांचे नेतृत्व, शौर्य आणि बलिदान तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाबद्दल या चित्रपटाद्वारे जगासमोर दाखविण्यात आले आहे. त्यामुळे, या चित्रपटाला शिवभक्त आणि शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत असून चित्रपटगृहात गर्दी होत आहे.त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा सध्या चर्चेत आहे. तसेच संभाजी महाराजांचे त्याग, बलिदान आणि शौर्याची गाथा म्हणजे हा सिनेमा. त्यामुळे, प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक शिवप्रेमींनी हा सिनेमा पाहायलाच हवा असा सूर निघत आहे.त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी आ.पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.


