परभणी (प्रतिनिधी) सकल जैन समाज संघाच्यावतीने नांदेड येथिल नियोजन भवन येथे जैन सन्मान सोहळा 2025 आयोजित करण्यात आला होता. यात येथील जैन गार्डन चे श्रीकांत काळे , पत्रकार विजय चोरडिया यांना जैनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी बोलताना ललित गांधी म्हणाले की अल्पसंख्यांक विकासासाठी राज्य सरकारने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्राज्य जैन अल्पसंख्यांक महामंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ना. ललित गांधी यांनी विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असे आश्वासन सकल जैन समाज संघाच्यावतीने नांदेड येथिल नियोजन भवन येथे आयोजित जैन सन्मान सोहळा 2025 येथे केले.

जैन समाज काही ठिकाणी श्रीमंत तर काही ठिकाणी अत्पंत गरीब आहे. आपल्या परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे आवश्यक आहे., यासाठी राज्य शासनाने जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून त्याच्या प्रथम अध्यक्षपदी ना. ललित गांधी राज्यमंत्री दर्जा यांची नियुक्ती केली आहे,स कल जैन समाज संघ नांदेडच्यावतीने त्यांचा नियुक्तीबद्दल जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते समाज बांधवांशी संवाद साधत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद जैन तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड भूषण डॉ.बाळासाहेब साजणे व उद्योगपती फुलचंदजी जैन (रवि मसाले) आणि नांदेड येथील सर्व मंदिरांचे अध्यक्ष उपस्थित होते. याप्रसंगी सकल जैन समाज सेवासंघाच्यावतीने डॉ. सौरभ जोगी, डॉ. रूपाली जैन, सुनिता सांगोले यांचा विशेष सन्मान तर श्रीकांत काळे परभणी विज़य चोरदिया मनिष जैन छत्रपती संभाजीनगर, अंड, कांचनमाला संगवे धाराशिव, प्रकाशचंद सोनी हिंगोली, जयप्रकाश दगडे ज्येष्ठ पत्रकार, मिलिंद एंबल, सामाजिक कार्यकर्ते हर्षदभाई शाह, भारतीय वनसेवेतील अधिकारी यश काळे, तर हास्थीमल बंब आणि माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांना जैनरत्न सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन सकल जैन समाजातील समाजोपयोगी कामांचा गौरव करून सन्मानप्राप्त व्यक्तीप्रती प्रेम व कृतज्ञता व्यक्त करणे हा आयोजनाचा मागचा उद्देश असल्याचे सचिव ऋषीकेश कोंडेकर यांनी सांगितले. कायक्रमाला सकल जैन समाजातील बहु संख्येने बधू भगिनी उपस्थित होते. सुत्रसंचलन ऋषीकेश कोंडेकर यांनी तर आभार रोहन कोंडेकर यांनी मानले. सकल जैन समाज एकीकरणासाठी चालविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


