परभणी (प्रतिनिधी) एन. व्ही. एस.जनकल्याण विद्या मंदिर लोहगाव ,रोड परभणी या ठिकाणी विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून डॉ धर्मराज चव्हाण उपस्थित होते.
यावेळी त्यांनि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रसंगी बोलत असताना डॉ चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास हा बरोबरच आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनावरही लक्ष ठेवलं पाहिजे व त्यातून मिळणाऱ्या अनुभवाच्या शिदोरीतून स्वतः मध्ये बदल करत यश संपादन केलं पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मराठवाडा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ढगे मॅडम , जनकल्याण शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरकट्टे सर परिसरातील पालक श्री भालेराव काका, श्री कांबळे सर, व शाळेतील शिक्षक श्री राऊत सर,खटिंग सर, भंडारवाड सर कुरेशी मॅडम, यां सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता..