पालम (प्रतिनिधी) सगरोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील कर्मयोगी बाबासाहेब देशमुख उर्फ के.ना. यांचे जन्मशताब्दी वर्ष 27 मार्च 25 ते 27 मार्च 26 असा साजरा करण्यात येणार आहे. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांचा जन्म पालम येथील देशपांडे वाड्यात झालेला आहे. बाबासाहेब देशमुख हे अत्यंत शिस्तप्रिय असून सगरोळी जिल्हा नांदेड येथे ग्रामीण भागात शाळा काढून तेथील गोरगरीब जनतेला ज्ञानदानासारखे पवित्र कार्य त्यांनी केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळालेला आहे.
दि.२८ मार्च रोजी पालम येथील देशपांडे यांच्या वाड्यात एका भव्य कार्यक्रमात दीप प्रज्वलित जन्मशताब्दी सोहळ्याला सुरुवात करून नरसी ते सगरोळी पर्यंत मशाल(ज्ञानज्योत) नेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मान्यवरांनी बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या सामाजिक कार्याची जाणीव पालमकरांना करून दिली. त्यांनी आयुष्यभर जातीवाद, वर्णवाद यांना विरोध करत सर्व जाती धर्माच्या जनतेला शिक्षण मिळुन जिवनात सक्षम व्हावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.
या कार्यक्रमाला कर्मवीर बाबासाहेब देशमुख यांचे चिरंजीव देविदासराव देशमुख, आशाताई देशमुख, विनोदराव देशमुख,स्मिता देशमुख, प्रमोद राव देशमुख, सुनंदाताई देशमुख, विलास देशपांडे , सुलोचनाताई देशमुख, अनुराधा देगलूरकर, भुजंगराव पालमकर, जयंत जकाते तसेच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, पालमचे नगराध्यक्ष वसंतराव सिरस्कर, नगरसेवक लक्ष्मणराव रोकडे, कैलास रुद्रवार, बाबासाहेब जामगे, शिवाजीराव दिवटे, लिंबाजीराव टोले,पांडुरंग रुद्रवार, दिलीप रुद्रवार, राजू शेठ पत्की, मुंजाभाऊ रोकडे, प्रमोद इनामदार, संतोष पत्की,पत्रकार शांतीलाल शर्मा सह गावातील असंख्य नागरिक व ब्रह्मवृंद उपस्थित होते.आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करत,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदुदेवा जोशी यांनी केले, संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन मनोज देशपांडे यांनी केले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


