परभणी: (प्रतिनिधी) कोणतीही कला परीक्षेमध्ये मार्क मिळवीण्या पेक्षाही जिवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन उपेंद्र दुधगावकर यांनी केले. ते ज्ञानोपासक महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला अनुसरून सांस्कृतिक या को-करीकुलर कोर्स साठीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी एक दिवशीय सांस्कृतिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलत होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने या विषयासाठी विविध कलाप्रकार शास्त्रीय गायन, सुगम गायन,शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम,महाराष्ट्राची लावणी, नाट्य, लोककला, जलसा, संहिता लेखन इत्यादी विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शक मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, पंकज खेडकर, त्र्यंबक वडस्कर, ऐश्वर्या डावरे आणि दासराव पुंडगे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कोणतीही कला परीक्षेमध्ये मार्क मिळवीण्या पेक्षाही जिवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन उपेंद्र दुधगावकर यांनी केले. शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासिका ऐश्वर्या डावरे यांनी गायन, वादन आणि नृत्य या तिघांच्या समूहांना मिळून संगीत म्हटले जाते आणि ते शास्त्रशुद्ध असणे गरजेचे असते याचं बरोबर त्यांनी शास्त्रीय नृत्य सादर करून हातांच्या मुद्रा आणि नृत्य याच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल. नाटककार त्रंबक वडसकर यांनी नाटक म्हणजे काय ?आणि ते सादर करताना अभिनय कसा फुलवत गेला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या लहानपणापासून घडलेल्या घटनांना उदाहरणाच्या स्वरूपात समोर ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल.
पंकज खेडकर यांनी लोक नृत्य सादर करताना पद्न्यास,ठेका आणि त्या नृत्याबद्दलची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते हे विशद करत एका नृत्याच विद्यार्थ्याना प्रशिक्षण ही दिल. जलसा हे सामाजिक प्रबोधनाच एक महत्त्वाच माध्यम आहे. जलसा कसा सादर केला पाहिजे याबद्दल दासा पुंडगे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शेख मोहम्मद बाबर तर प्रमुख उपस्थिती आयक्यूएसी कोऑर्डिनेटर प्रो.डॉ.आनंद मनवर यांची होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भास्कर गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका पूजा सपाटे यांनी केले.या कार्यशाळेला महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.


