परभणी (प्रतिनिधी) श्री सत्य साई सेवा संघटना वतीने श्री सत्य साई बाबांच्या दिव्य ज्योतीचे प्रशांती निलयम पुट्टपरती आंध्र प्रदेश येथून परभणी जिल्ह्यात स्वामीच्या प्रेम ,सेवा, एकता व अध्यात्मिक जागृतीचा संदेश घेऊन पवित्र दिव्य ज्योत दिनांक ३ रोजी आगमन होत आहे .श्री सत्य साई दिव्य ज्योती स्वागत कार्यक्रम दिनांक ३ जुलै रोजी सायं ७ ते ८-४० परभणी शहरातील वसमत रोड डॉ शेळके -निवास सत्संग हॉल येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ही ज्योत केवळ एक दीप नसून स्वामीचे प्रेम , एकता ,सेवा आणि अध्यात्मिक जागृतीचा संदेश घेऊन प्रवास करत आहे. पवित्र उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी उत्साहात सहभागी व्हावे.श्री सत्य साई बाबांच्या दिव्य ज्योतीचे मार्गक्रमण या प्रमाणे राहणार आहे.दिनांक 3 जूलै रोजी सकाळी ९ वाजता नांदेड जिल्हयाकडून वसमत येथे हस्तांतरण होत आहे.परभणी मार्गे पोखर्णी फाटा, वसाह भाविकांच्या दर्शनसाठी ठेवण्यात आली आहे.त्यानंतर इंदेवाडी फाटा, कैलासवाडी फाटा, केकरजवळा,पाथरी शहर,वरखेड,डोंगरगाव,भेंडाळा,बंडाला या मार्गाने जात असून परतीचा प्रवास लगेचच भेंडाळा पाथरी,मानवत,परभणी येथे आगमन होणार आहे.सायंकाळी ७ वाजता भजन व दिव्य ज्योती दर्शन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी दिनांक ४ रोजी यशवंत नगर,हनुमान मंदिर,येथे बालविकास च्या मुलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दिव्य ज्योती कार्यक्रमाचे महत्व सांगितले जाणार आहेत.या कार्यक्रमानंतर दर्शन सोहळा कार्यक्रम होणार आहे.त्या नंतर दिव्य ज्योती पुढील मार्गक्रमण .हिंगोली मार्गे. कडतीकडे प्रयाण केले जात आहे.दि. ५ रोजी सकाळी ७ वाजता कडती,कारेगाव,खडकी,कान्हेरगाव येथे दुपारी ३ वाजता वाशिम जिल्ह्याकडे दिव्या ज्योती हस्तांतरण होत आहे. दरम्यान मार्गक्रमाने येणाऱ्या गावातील सर्व भाविक भक्तांनी दिव्य ज्योतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, श्री सत्य साई बाबांच्या कृपा आशिर्वाद प्राप्त करून घ्यावेत,असे आवाहन श्री सत्य साई सेवा संघटना परभणीचेवतीने डॉ.ए .एल. शेळके व अॅड. वसंतराव लांडे यांनी केले.


