परभणी (प्रतिनिधी) आपल्या देशातील विविध आस्था, पंथ आणि धर्मांमध्ये सामाजिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव जोपासण्याच्या उद्देशाने परभणी येथे विशेष ‘मस्जिद परिचय’ कार्यक्रमाचे आयोजन दि 25 रोजी दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत मस्जिद ईनायत, मदरसा ईनायत उल उलूम, ईनायत नगर जुना पेडगाव रोड येथे करण्यात आले आहे.
मस्जिद काय असते? मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि माहिती नागरिकांना प्रत्यक्ष मिळावी, तसेच जातीय सलोखा व सामाजिक एकात्मता अधिक बळकट व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
”संपूर्ण मानवजात एकाच माता-पिताची संतान आहे” असा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी आपल्या इष्टमित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मस्जिद कमिटी व समस्त मुस्लिम समाज, परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


