परभणी,(प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी खासदार संजय जाधव आणि जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, शिवसेना महानगरप्रमुख माणिक पोंढे, माजी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, सभापती पंढरीनाथ घुले, तालुकाप्रमुख प्रभाकर कदम, अतुल सरोदे, बाळासाहेब पानपट्टे, सचिन पाटील, रामप्रसाद रनेर, विजय भालेराव, शुभम पाष्टे, प्रदीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग खिल्लारे, बाजार समिती संचालक रावसाहेब रेंगे, अंगदराव अंभोरे, अशोक गव्हाणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख गीता सूर्यवंशी, जिल्हा संघटक सुशीला चव्हाण, भागवत वाघ, सचिन मोटे, अशोक कांबळे, गणेश मुळे, अशोक गिराम, दत्ताराव आरमळ, राम शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे’ अशा घोषणा देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.


