परभणी,(प्रतिनिधी) : येथील गंगाखेड रस्त्यावरील उड्डाणपुलावर मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास ऊस घेऊन जाणार्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने दुतर्फा वाहतुक ठप्प झाली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते खानापुर नाका तसेच विसावा नाक्यापासून ते गंगाखेड नाका या जिंतूर रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक सुरु आहे. गंगाखेड नाक्यावरील उड्डाण पुलावर जड वाहनांची ही वाहतूक पर्यायी रस्त्याकडून वळविण्यात आली आहे. असे असतांनासुध्दा काही ट्रॅक्टर व ऊस घेऊन जाणारे ट्रक उड्डाणपुलावरुन वाहतूक करीत आहेत. मंगळवारीही दोन ट्रॉल्यासह ऊस घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर उड्डाणपुलावर पलटी झाला. या ट्रॅक्टरचे एक्सल तुटल्याने तो अपघात झाला. त्यामुळे ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पडला व उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी मोठी धावपळ करीत तो ऊस तेथून हटविला व वाहतूक सुरळीत केली.
Wednesday, November 25
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष धारासूरकर; कार्याध्यक्षपदी दिलीप माने तर सरचिटणीसपदी प्रविण देशपांडे
- झरी येथील ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; अन्य एक गंभीर जखमी जलालपुर पाटीजवळील घटना
- पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी; हिंगोलीत ‘जनसंवाद’ उपक्रमात ९ तक्रारींची नोंद; तक्रार निवारणासाठी तात्काळ सूचना
- 26 नोव्हेंबरला ठाणे येथे होणार्या संविधान रक्षा मार्चच्या नियोजनासाठी काँग्रेसची जिल्हास्तरीय बैठक
- बी 67 च्या शेतकर्यांवर पाणीवाटपात अन्याय; शेतकरी आक्रमक : 9 डिसेंबरपूर्वी चारीला पाणी सोडण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
- श्री क्षेत्र हातनूर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव : श्री नागनाथ बारवतीर्थ परिसरात दीपप्रज्वलन
- ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत; राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
- हुंडाबंदी दिन’ साजरा करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन


