परभणी,(प्रतिनिधी) : शहरातील व्यंकटेश नगरातील श्री व्यंकटेश्वर मंदिरात शुक्रवारी (दि.15) रोजी कार्तिक पोर्णिमा देव दिवाळी निमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आला. या वेळी दहा हजार पणत्यांनी व्यंकटेश्वर मंदिरासह परिसर उजळून निघाला.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कार्तिक पोर्णिमा देव दिवाळी निमित्त या संस्थांच्या वतीने दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आयोजित केलेल्या या सोहळ्यास हभप माधवराव आजेगांवकर, वेदशास्त्रसंपन्न प्रमोदशास्त्री कुलकर्णी, संस्थांचे अध्यक्ष सर्वोत्तम पाथरीकर, सौ. सुनिता आनंद भरोसे, आनंद पाटील, मनोहर गुरु मिरखेलकर, इंजि. शंकरराव आजेगांवकर आदी उपस्थित होते.
यावेळी मंदिरावर सुंदर अशी रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिरासह मंदिर परिसरात भक्तांनी दहा हजारांवर पणत्या लावल्या. त्यामुळे हा संपूर्ण परिसर उजळून निघाला. सायंकाळी 7.30 वाजता आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.


