पालम(प्रतिनिधी) वैराग्यमूर्ती ब्रह्मनिष्ठ सदगुरु श्री बाळकृष्ण महाराज यांची 121 वी पुण्यतिथी पर्वकाळ निमित्त पालम येथे अखंड हरिनाम सप्ताह चातुर्मास समाप्ती ज्ञानेश्वरी पारायण श्री दत्त याग व श्री मदभागवत कथा दिनी ज्ञानयज्ञ सोहळा प्रारंभ आज दिनांक 25 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
दैनंदिन कार्यक्रम काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण व भागवत पठण गाथा भजन भागवत कथा व प्रवचन धूप आरती हरी कीर्तन हरीजागर सदरील कार्यक्रमास गाथा प्रमुख हभप मंचक महाराज गोळेगावकर हभप दत्ता महाराज पिंपरीकर , ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख हभप शाहूराव महाराज पत्की कीर्तन वीणाप्रमुख हभप अण्णा महाराज सर्फराजपूरकर हभप नामदेव गुरुजी पालमकर , दिनांक 25 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी हभप श्री राजेंद्रदास महाराज कौडगावकर , दिनांक 26 नोव्हेंबर 2024 मंगळवार हभप.श्री शंकर महाराज घटांग्रेकर , दिनांक 27 नोव्हेंबर 2024 हभप. श्री चंद्रकांत महाराज आंडगेकर, दिनांक 28 नोव्हेंबर 2024 हभप श्री प्रवीण शास्त्री केळीकर , दिनांक 29 नोव्हेंबर 2024 हभप.श्री एकनाथ महाराज पाळेकर, दिनांक 30 नोव्हेंबर 2024 हभप श्री विजयानंद महाराज सुपेकर , दिनांक 01 डिसेंबर 2024 हभप श्री गुरुवर्य नारायण महाराज पालमकर , दिनांक 02 डिसेंबर 2024 हभप श्री पद्माकर महाराज वरकर , दिनांक 03 डिसेंबर 2024 हभप गुरुवर्य श्री वामन महाराज पालमकर, याप्रमाणे कीर्तन सेवा संपन्न होईल तसेच दिनांक 02 डिसेंबर 2024 रोजी सकाळी श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज यांच्या समाधीस श्री क्षेत्र जांभूळबेट सोमेश्वर महाअभिषेक करण्यात येईल.
व्यास पूजन व भव्य पालखी सोहळा पालम शहरातून निघेल यानंतर महाप्रसाद होईल तसेच दिनांक 03 डिसेंबर 2024 रोजी श्री गुरू पूजेचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमास पालम सीरपूर, सर्फराजपूर खडी कोडगाव गोळेगाव पुयनी केरवाडी खोरस कापसी फरकंडा आनंदवाडी डिग्रस तेलजापूर सोमेश्वर आरखेड येथील भजनी मंडळी सेवा देतील सदरील कार्यक्रम वैरागमूर्ती ब्रम्हनिष्ठ सद्गुरु बाळकृष्ण महाराज संस्थान पालम तालुका पालम जिल्हा परभणी येथे संपन्न होईल या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन हभप गुरुवर्य श्री वामन महाराज पालमकर तथा हभप गुरुवर्य श्री नारायण महाराज पालमकर यांनी केले


