परभणी (प्रतिनिधी) विविध धर्मांना, भाषा,प्रांत अनेक संस्कृतींना तसेच देशातील साडेसहा हजार जातींना एकत्र जोडण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे, “खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांचा धर्मग्रंथ हा संविधानाचा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांनी केले. संविधान सन्मान रॅलीला वाकोडे यांची विशेष उपस्थिती होती.
शहरात 29 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवार बाजार येथून सकाळी दहा वाजता आयोजक आम्ही तुम्ही सर्व भारतीय या बॅनरखाली भव्य प्रमाणात संविधान जनजागृती मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकी मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरां चा सजीव देखावा एका लहान मुलाने साकारला होता त्या सोबत संविधानाची प्रत आणि भारतीय लेखणी प्रती रुपी ठेवण्यात आली होती. मिरवणुकी मध्ये अनेकांच्या हातात संविधान जागृती चे विविध घोषणा फलक ही देण्यात आले होते,भारतीय संविधानाच्या जयघोष करत ही मिरवणुक शनिवार बाजार येथून पुढे शिवाजी चौक मार्गे गांधी पार्क आर.आर.टॉवर स्टेशन रोड मार्गे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळ्याला अभिवादन करत, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर स्टेशन रोड परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात या मिरवणुक चा समारोप करण्यात आला.
मिरवणुकी मध्ये बँड पथकावर भारत मातेचे गीत,महाराष्ट्र गीत आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मिरवणुक आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भव्य पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर सामूहिक संविधान उद्देशिका चे वाचन करण्यात आले.
यावेळी या मिरवणुकी चे समन्वयक प्रा.विठ्ठल कांगणे संबोधित करताना म्हणाले की, परभणी जिल्हा हा विविध चळवळीचा केंद्र आहे या भारतीय संविधान सन्मान मिरवणुक च्या माध्यमातून आम्ही ही संविधान चळवळ संपूर्ण देशभरात राबविण्याचा मानस आहे. आजच्या तरुणांच्या हातात देशाचे भवितव्य आहे हे भवितव्य घडवायचे असेल तर प्रत्येकाच्या घराघरात भारतीय संविधान पोहोचण्याची जबाबदारी या चळवळीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत.
डॉ.भारत नांदुरे यांच्या वतीने स्वखर्चातून मोफत पन्नास हजार संविधान वाटपाचे नियोजन करण्यात आले. मिरवणुकी दरम्यान विविध दुकानांवर अनेक लोकांना संविधान पुस्तिका वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या मिरवणुकी मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींचा जास्त प्रमाणात सहभाग होता त्या सोबत शेकडो विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ही मिरवणुक यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे प्रा.विठ्ठल कांगणे,सुधीर साळवे,लखन जामकर,गौतम भालेराव,सतिश भिसे,कैलास पवार,किशोर रणेर,राहुल घनसावंत,आशिष वाकोडे, सुभाष जोंधळे, गौतम भराडे, बादल शेख,दिपक खंदारे प्रमोद कुटे,सुभाष गायकवाड विश्वजीत वाघमारे,सम्राट पंचांगे,सचिन पाचपुंजे,विशाल जोंधळे,विश्वजित गायकवाड, चंद्रकांत लाटे,सतिश वाकळे, सुभाष जोंधळे, इम्रान जामकर, सिद्धार्थ सोनवणे,अक्षय भराडे,मिलिंद घुसळे,माणिक जव्हार बाळासाहेब भराडे हरिष पंडीत आनंद पंडीत, तुषार कांबळे,संजय मुळे, अनिल थोरात,आदी भारतीय संविधान प्रेमी युवकांनी परिश्रम घेतले.*


