परभणी (प्रतिनिधी) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील भारतीय संविधान प्रतीकृतीची समाज कटंकाने तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरोपीवर कडक कारवाई नार्को टेस्ट करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीआंबेरे यांनी आज जिल्हाधिकारी तसेच पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे केली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असं म्हटले आहे की दिनांक 11 रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला अचानक हिंसक वळण लागले. या निषेध आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रकाराची चौकशी व निरपराध अटक केल्याची सुटका करावी, नुकसानग्रस्त व्यापाऱ्याचे योग्य पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी आज डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या वतीने जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रघुनाथ गावडे , पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्यांचा
समवेत पीआरपी चे नेते गौतम मुंडे, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुधीर कांबळे , बुद्धभूषण हत्तीअंबिरे, उत्तम गायकवाड, प्रदीप जोंधळे , राजेश रणखांबे, अँड मोती शिंदे, अजय रसाळ, मिलिंद घुसळे, मंचक खंदारे , अमोल धाडवे, अजय वाघमारे ,आकाश गुळवे इत्यादीची उपस्थिती होती.


