परभणी,(प्रतिनिधी) : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने 24 ते 29 डिसेंबर दरम्यान येथील सँनरो नॉलेज सिटी (विद्याविहार शैक्षणिक संकुल) येथे सुरभि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरभी महोत्सवात 24 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता स्पोर्ट्स डे निमित्त घटक संस्थेतील सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांचे पथ संचलन, लेझीम, अरेबिक्स मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण होणार आहे. 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता एकात्मिक आदिवासी प्रकल्प तसेच सायंकाळी 6 वाजता क्युरिअस कीड्स, फिनकीडस, ज्ञिज्ञासा बालविहार व ज्ञानतीर्थ बालवाडीचा सांस्कृतिक कार्यक्रम, 26 डिसेंबर महाराष्ट्राची लोकधारा व सायंकाळी 5 वाजता पॉस्परस पब्लिक स्कूलचा ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ या सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. प्रिन्स इंग्लिश स्कुल सांस्कृतिक कार्यक्रम Vibrant India यावर आधारीत कार्यक्रमाचे 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले आहे. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धा तसेच सायंकाळी 5 वाजता उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘संस्कृती महाराष्ट्राची तसेच रामायण महानाट्य’ या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले आहे. रौप्य महोत्सव वर्षानंतर माजी विद्यार्थी मेळावा 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. अपूर्वा पॉलीटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डी.एड, बीएड सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच आनंद मेळावा 26 ते 29 डिसेबर दरम्यान आयोजीत करण्यात आले आहे.
या सुरभि महोत्सवास सेलू शहरातील सर्व नागरिकांनी, शालेय पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा सुरभि महोत्सवाचे आयोजक डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


