परभणी (प्रतिनिधी) परभणी -हिंगोली या दोन जिल्हयासाठी तब्लिगी जिल्हास्तरावर इज्तेमा दिनांक 1, 2 जानेवारी 2025पासून सुरु होणार आहे. या तब्लिगी इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या धार्मिक इज्तेमासाठी लाखोंच्या संख्येत भाविकांची उपस्थिती राहणार आहे . इज्तेमासाठी येणाºया भाविकांना सुविधा मिळावी म्हणून जिल्ह्यातील विविध भागातून हजारो युवक या ठिकाणी दिवसरात्र यासाठी परिश्रम घेत आहे.
या इज्तेमाची वैशीष्टे म्हणजे या ठिकाणी केवळ आणि केवळ इस्लाम धर्म व त्याची शिकवण, अल्लाहची भक्ती तसेच अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मुहम्मद पैगंबर यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. नियोजनबद्ध बसण्यासाठी सभामंडप उभारण्यात आला आहे मुख्य सभामंडपात एकाच वेळी लाखांपेक्षा अधिक नागरीक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याच प्रमाणे येणाºया भावीकासाठी पार्किंग व्यवस्था इज्तेमात येणाºया चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे पार्किंग सांभाळण्यासाठी हजारो स्वयंसेवकांना दोन्ही बाजूंनी जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे तसेच पेंडॉलमध्ये व्यवस्थेसाठी स्वयंसेवक राहणार आहे. इज्तेमासाठी स्वच्छतागृह उभारणे , लाईट , ध्वनियंत्रणा आदी काम जोमाने सुरू आहे
शहरातील अनेक स्वयंसेवकांना स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाविकांनावजुसाठी धुण्यासाठी व स्वच्छतेसाठी व्यवस्था गुसलखाने ,जेवणासाठी दावत सहा झोन बनविण्यात आले असुन प्रत्येक झोनमध्ये एका वेळी हजारो भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. इज्तेमा स्थळी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहावा म्हणून उच्च क्षमतेचे विद्युत ट्रान्सफार्मर तसेच विज पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास यासाठी जनरेटर बसविण्यात आले मैदानाच्याचारही बाजूंनी अद्ययावत ध्वनियंत्रणा , चोहीकडे रोषणाई साठी फोकस बसवीण्यात आले आहे. इज्तेमा ठिकाणी कुणी आजारी किंवा दुखापत झाल्यास पडल्यास त्यासाठी रुग्णालय सह उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, औषधोपराची व रूणवाहिकाची व्यवस्था केली जाणार आहे.


