पालम (प्रतिनिधी ) शहरात श्री संत मोतीराम महाराज यांच्या जन्म भूमी येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा देवघर येथे भविष्य महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन दि.२ जानेवारी ते ९ जानेवारी पर्यंत आयोजित केले.
या ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्थापना केलेली असून दर शुक्रवारी कुंकूमार्चना विधी केला जातो. शनिदेवाची मुर्ती स्थापना केली आहे. नवगृह मुर्ती स्थाना केले आहे. नवगृहाचे जप व होम हवन केले जाते तसेच सदगुरू साईकृष्ण गोशाळा ही जांबुळबेट रोड येथे स्थापना करण्यात आलेली आसुन या सर्वांचे औचित्य साधून गुरुवार 02 जानेवारी ते 09 जानेवारी गुरूवार पर्यंत पालम येथे भविष्य महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कथेचे कथा प्रवक्ता म्हणून श्री ह.भ.प. नारायण महाराज (शास्त्री) पालमकर उपस्थित राहणार आहेत.या कथाचे यजमान गजानन शंकरराव नारलावार व बाजीराव चव्हाण आहेत. तरी या भविष्य महापुराण कथेला तालुक्यातील सर्व भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक पदुदेवा दिनकर जोशी पालमकर यांनी केले आहे.


