परभणी (प्रतिनिधी) मौजे डिग्रस ता परभणी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या गायरान जमीनीतून जालना नांदेड समृधी महामार्गासाठी मुरूम नेण्यासाठी ग्रामपंचायत अग्रेसर असुन मानवी हक्क अभियान च्या माध्यमातून एक इंचही मुरूम नेऊ देणार नाही असा ईशारा मानवी हक्क अभियान च्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे.

मानवी हक्क अभियान हि एक सामाजिक संघटना असुन गेल्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात अतिक्रमित गायरान जमीनीवर अतिक्रमण शासनाच्या निर्णयानुसार नियमाकुल करण्यासाठी, दलित, आदिवाशी, भुमहिन शेतमजूर यांच्यावरील अन्याय अत्याचाराविरुद्ध लोकशाही मार्गाने संघर्षशील कृतीतून न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे.
मानवी हक्क अभियान च्या वतीने 2027 ते 2010 या तीन वर्षात मा तहसीलदार साहेब, उपविभागिय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी,मा विभागीय महसुल आयुक्त, मा महसुल मंत्री,व मा मुख्यमंत्री यांना शासनाच्या निर्णय 1989 च्या जिआर प्रमाणे सर्व 17 पुराव्यासह प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.

याचाच एक भाग म्हणून मौजे डिग्रस ता परभणी येथील गेल्या 45 वर्षापासून मौजे डिग्रस ता परभणी येथील गट नंबर ..या 8 हेक्टर गायरान जमिनीवर एकुण 10 कुटुंबा आपल्या उदरनिर्वाह करून उपजिविका भागवित आहेत. परंतु डिग्रस येथील ग्रामपंचायत पैशाच्या लोभापायी येथील दलित कुटुंबाचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या गायरान जमीनीतून नांदेड- जालना समृधी या महामार्गासाठी मुरून नेण्यासाठी अतिशय गतीशील प्रयत्न करत आहेत. तेव्हा मे जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती कि मौजे डिग्रस येथील ग्रामपंचायला तात्काळ नोटीस काढून गायरान जमिनीतून मुरूम नेण्यासाठी चाललेला प्रयत्न तात्काळ थांबविण्यात यावा . अन्यथा जिल्ह्यातील सर्व दलित सामाजिक संघटना गायरान धारकांना न्याय मिळवून रस्त्यावर उतरल्यावर राहणार नाहीत. व भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
असा ईशारा मानवी हक्क अभियान च्या व गायरान धारकांच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे निवेदनावर
पप्पूराज शेळके ,नारायण अंभोरे दादाराव कांबळे,हरिभाऊ सुतकरे,नंदाबाई सुतारे,सुदाम अंभोरे,राणोजी अंभोरे,उतम अंभोरे,नागोराव सुतारे,गुलाब सुतारे,दतराव अंभोरे अदीच्या सह्याआहेत. (छाया संजय घनसावंत)



