परभणी (प्रतिनिधी) भीमा कोरेगाव शौर्य विजय दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने दिला जाणारा नामांतर योद्धा पुरस्कार दलीत पँथर चे सक्रिय नेते पूर्णा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाशदादा कांबळे यांना नामांतर लढ्यातील योगदाना बद्द्ल जाहीर करण्यात आला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे म्हणून सतरा वर्षे चाललेल्या नमांतर लढ्यात योगदान देणाऱ्या एका आंदोलकाचा दरवर्षी सन्मान केला जातो.
मुंबई येथील ५ सप्टेंबर १९८३ च्या जेलभरो आंदोलनात सहकाऱ्यांसह प्रकाशदादा कांबळे हे सहभागी झाले होते. नाशिकच्या कारागृहात २१ दिवस त्यांना
कारावास भोगावा लागला. धम्म मैत्री संवाद अभियान आयोजित १९ जनेवारी रोजी रविवारी सकाळी ११: ३० वा होणाऱ्या बी रघुनाथ सभागृह येथे शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रम स्थळाला स्मृतिषेश पँथर विजयराव वाकोडे नगरी असे नाव देण्यात आले आहे तर विचार मंचाला शहीद सोमनाथ सूर्यवंशी असे नाव दिले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


