परभणी (प्रतिनिधी) जागतिक धम्म ध्वज दिनानिमित बुधवार दि. ८ जानेवारी रोजी, सकाळी ११ वाजता थायलंड येथील भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत इंद्रायणी माळ, मौजे डफवाडी- मांडाखळी परिसरात पहिल्यांदाच नियोजित महाविहाराच्या १० एकर जागेवर ५० फूट उंचीच्या धम्म ध्वजाचे ध्वजारोहण प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे ,अध्यक्ष आश्रय सेवाभावी संस्था तथा प्रदेशअध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस अनु.जाती विभाग, यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास थायलंड येथील भदंत फ्रा. पट्टरघुन कृदांग ,यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेता डॉ. गगन मलीक, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो पूर्णा, भदंत मुद्दीतानंद थेरो, भदंत मोग्गलायन , आ.राजेश विटेकर पाथरी, डॉ. सिध्दार्थ भालेराव, चेअरमन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी पेठशिवणी, दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे मुंबई, पिआरपीचे नेते गौतम मुंडे आदीं मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील बौध्द उपासक – उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोहळ्याचे आयोजक तथा निमंत्रक डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, व समन्वय समितीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


