परभणी,(प्रतिनिधी) : प.पु. राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांच्या जन्मभूमी श्रीक्षेत्र पाचलेगाव ते समाधीस्थान श्रीक्षेत्र नैकोटवाडी या दरम्यानच्या पदयात्रेस रविवार 5 जानेवारी रोजी पाचलेगाव येथून प्रारंभ झाला. मंगळवार 7 जानेवारी रोजी या पदयात्रेसह पालखीचे परभणी महानगरात आगमन झाले.
मध्यवस्तीतील देशमुख गल्लीतील मोठा मारोती संस्थानच्या वतीने या पालखीचे मंगळवारी सायंकाळी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब देशमुख, अॅड. दीपक देशमुख, अरविंद देशमुख, श्रीधर देशमुख, अशोक परळीकर, आर.एस. देशमुख, पंकज देशमुख, सतीश देशमुख, दिलीप नगरसाळे, दिलीप देशमुख, गजानन लव्हाळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, बुधवार 8 जानेवारी रोजी तरोडा फाटा, तर मुक्कामी पोखर्णी संस्थानात, 9 जानेवारी रोजी दैठण्यात तर मुक्कामी माँ कनकेश्वरी अन्नछत्रालयात, 10 जानेवारी रोजी आनंदीवाडीत तर मुक्कामी तिवठाण्यात, 11 जानेवारी रोजी मोहाळा तर मुक्कामी खडक येथे, 12 जानेवारी रोजी अवलगावात तर मुक्कामी नैकोट्यात व 13 जानेवारी रोजी या पदयात्रेचे दत्तवाडीत आगमन होणार आहे. या ठिकाणी हभप दत्तराव महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
दरम्यान, या पदयात्रेत नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व 13 जानेवारीच्या दत्तवाडीतील मुख्य उत्सवातही सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.


