परभणी (प्रतिनिधी) राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून करण्यात येत आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि अमुलाग्र व्यापक बदल होत असताना त्या विषयीची जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची नितांत गरज लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबतच्या सकारात्मक बाबी पोहोचविण्या साठी सर्व अकृषी विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबविण्यात आले आहे.

याचाच एक भाग म्हणून ज्ञानोपासक महाविद्यालयातील बारावी कला,वाणिज्य व विज्ञान या वर्गातील विद्यार्थ्यां समोर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. साधन व्यक्ती म्हणून प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे आणि प्रोफेसर डॉक्टर आनंद मनवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.विजय घोडके तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.व्ही. टी.नालटे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी प्रा.डब्ल्यू. बी. भोसले प्रा.के.एस. राऊत आणि प्रा. डी.डी. काकडे आदीं उपस्थित होते.


