परभणी ( प्रतिनिधी) भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर पुळ्यासमोर नामविस्तार दिन सकाळी ठिक 10ः30 वा उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी सुरुवातीस तथागत भ. बुध्द यांच्या मुर्तीचे पुजन करुन भंते पी, धम्मानंदजी विश्वनाथ झोडपे, रामचंद्र रोडे यांच्या हस्ते डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करण्यात आला. भंते पी. धम्मानंदजी यांनी उपस्थितांना ञिसरण पंचशील दिले. कार्यक्रमाचे सुञसंचलन तालुका अध्यक्ष एम. एम. बरे यांनी केले. नामांतर लढ्यातील जेष्ठ नेत्या राणुमाय वायवळ व रामचंद्र रोडे यांनी नामांतर लढ्याचा ईतिहास सांगीतला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धबाले यांच्यासह जिल्हासरचिटणीस डि. आय. खेडकर, जिल्हाकोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे, माजी जिल्हाध्यक्ष व्हि. व्हि. वाघमारे,संस्कार साचिव एस. एस. साळवे, सुनिल एस. पवार, संरक्षण सचिव शिवाजीराव वाव्हळे, भुषण मोरे, एन, जी. गोधम, नागनाथ सोनुले, ज्ञानोबा खरात, सुनिल कोकरे, भारत देवरे, सुभाषराव मकरंद, संजय बगाटे, शाहीर नामदेव लहाडे, पुसाराम साळवे, व्यंकटेश राक्षसे, प्रा. डाॕ. अरविंद लोणकर, अशोकराव गायकवाड, सुखदेव भंडारे, मस्के साहेब, ॲड. बाबासाहेब जाधव, काकडेताई यांच्यासह बौध्द उपासक उपासिका मोठ्या संखेने उपस्थितीत होते. शेवटी नामांतर लढ्यातील शहीदांना सर्वांच्या वतीने क्ष्रध्दांजली वाहण्यात आली व सरणत्तय घेउन कार्यक्रम संपवण्यात आला. ( छाया संजय घनसावंत)


