परभणी (प्रतिनिधी) भीमा कोरेगाव विजय दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामंतर दिनाच्या निमित्ताने धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने रविवार १९ जानेवारी रोजीशहीद सोमनाथ सूर्यवंशी विचार मंच, स्मृतिशेष विजय वाकोडे नगरी बी रघुनाथ सभागृह येथे शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा आयोजित केला आहे.
व्याख्यान,सांस्कृतिक प्रबोधन व नामांतर योद्धा पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सकाळी ११:३० वाजता या सोहळ्याचे उद्घाटन धम्मदुत डॉ सिद्धार्थ हत्तीअंबीरे (प्रदेशाध्यक्ष काँग्रेस अनु जाती विभाग) यांच्या हस्ते होणार असून मुंबई येथील प्रख्यात व्याख्याता सुरेखा पैठणे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलंकृता कश्यप बगाटे (अप्पर कोषागार अधिकारी नांदेड) तर विशेष अतिथी म्हणून डॉ भारत कदम (उपजिल्हाधिकारी लातूर) उपस्थीत राहणार आहेत. नामांतर लढ्यातील योगदानाबद्दल आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दलित पॅंथरचे माजी जिल्हा अध्यक्ष जेष्ठ नेते प्रकाश दादा कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते नामांतर योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रानुबाई वायवळ, मिलिंद सावंत, भगवान जगताप, गौतम मुंडे, प्रो डॉ सुनील अहिरराव प्रो डॉ आनंद मनवर,प्रो रामप्रसाद खंदारे, दिपक खंदारे, डॉ श्यामसुंदर वाघमारे,आशाताई खिल्लारे ,वर्षाताई सेलसुरेकर, सुनिता साळवे ,अनिता सरोदे ,डॉ धनंजय बनकर, किरण मानवतकर, राजू सोनवणे, गौतम भराडे, संजय सारणीकर, आशिष वाकोडे, धम्मदीप रोडे ,ॲड पवनकुमार शिंदे, प्रमोद कुटे ,बिट्टू दातार ,सचिन पाचपुंजे उपस्थीत राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गीत शौर्य नामांतराचे हा सांस्कृत प्रबोधनाचा कार्यक्रम होणार असून यात गायिका प्रीती भालेराव गायिका सुनिता कीर्तने गायिका भारतीय राऊत गायक प्रेमदास पुंडगे प्रा शाहीर शिवाजी कांबळे प्रेम वाकोडे सहभागी होणार आहेत.
या सोहळ्यास फुले शाहू आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या सोहळ्याचे आयोजक सुरेश हिवराळे संजय बगाटे कचरू गोडबोले विठ्ठल नंद, सुधाकर श्रीखंडे एम एम बरे बाबुराव सरोदे, सुनील पवार,भूषण मोरे समीर रोडे इंजी आकाश खिल्लारे, बाबासाहेब धबाले सुदाम तूपसुंदर संजीव अढागळे, अतुल वैराट लखन सौंदरमल
आदींनी केले आहे.


