परभणी (प्रतिनिधी) शहरातील बी रघुनाथ सभागृहात आज रविवार 19 जानेवारी रोजी धम्ममैत्री संवाद अभियानाच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख व्याख्यात्या म्हणून सुरेखा पैठणे या होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलंकृता बगाटे या होत्या व उद्घाटक म्हणून मिलिंद सावंत हे होते. याच बरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ भारत कदम, धम्मदीप रोडे, प्रमोद कुटे, गौतम मुंढे, डॉ. धनंजय बनकर, किरण मानवतकर, रानुबाई वायवळ, सुनीता साळवे, वर्षा सेलसुरेकर, अनिता सरोदे, भूषण मोरे आदीं मान्यवर उपस्थित होते.
आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात दलित पँथरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांना नामांतर योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर आज संपन्न झालेल्या शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्याचे आयोजन धम्म मैत्री संवाद अभियानचे संजय बगाटे, सुरेश हिवराळे आदींनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धम्ममैत्री संवाद अभियानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ( छाया संजय घनसावंत)


