परभणी,(प्रतिनिधी) : परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या नवा मोंढ्यातील मीनाताई ठाकरे मार्गावर रस्त्याच्या कामांना 30 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मुहूर्त लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष प्रताप भैय्या देशमुख यांच्या पुढाकाराने अखेर या रस्त्याला पुनर्जन्म मिळालाय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी या दयनिय अवस्थेतील रस्त्याची प्राधान्याने दखल घेतली व या भागातील सर्व व्यापार्यांसह नागरीकांना रस्त्याचे काम करुन देवू, असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे पुढाकार घेवून, पाठपुरावा करीत देशमुख यांनी या रस्त्याच्या कामांना सुरुवात करुन दिली.
मंगळवारी (दि.24) या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी या भागातील व्यापार्यांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 30 वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागल्याबद्दल व भक्कम पाठपुरावा करीत शब्द पाळल्याबद्दल व्यापार्यांसह नागरीकांनी देशमुख यांचे आभार मानले. ( छाया उत्तम बोरसुरीकर)


