परभणी (प्रतिनिधी) मंगळवार दि.7 जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची डॉ.सुभाष कदम, हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, संतोष देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विवीध प्रश्नांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात खरीप हंगाम 2024 मधिल अतिवृष्टीचे प्रलंबीत अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, 2024 च्या खरीप हंगामातील नुकसान झालेल्या अधिसूचित शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीम पिक विमा भरपाई देण्यात यावी, सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांच्या माध्यमातूनविनाविलंब जिल्हयातील संपूर्ण सोयाबीन खरेदी करण्यात यावी, सिल्क उत्पादक शेतकऱ्यांचे शेडसह ईतर प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यात यावे, तसेच कापूस खरेदी केंद्र व ईतर शेती विषयांच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी प्रतिनिधी व सर्व विभाग प्रमुख यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी अशा मागण्या मांडण्यात आला. ( छाया- संजय घनसावंत)


