Author: Lok Sanchar

परभणी,प्रतिनिधी) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आयोजित खासदारांच्या बैठकीत परभणी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि विविध प्रलंबित प्रश्‍नांबाबत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सविस्तर चर्चा करत रेल्वे प्रशासनासमोर अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ आणि रेल्वे सेवांचे आधुनिकीकरण यावर त्यांनी विशेष भर दिला. बैठकीत नांदेड रेल्वे मंडळाचा विस्तार मराठवाड्यातील अधिक भागांपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. परभणी, पूर्णा आणि परळी वैजनाथ येथील प्रस्तावित रेल्वे बायपासची कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच परभणी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती देण्याची मागणीही करण्यात आली. परभणी स्थानकावर कोच वॉटर फिलिंगची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणे, प्लॅटफॉर्म…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : सक्षम व जबाबदार युवक घडविण्यासाठी तसेच आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत भारताच्या निर्मितीसाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले. परभणी शहरातील बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्व. प्रा. वासंतीताई नावंदर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘आत्मचिंतन दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉ. दीनानाथ फुलवाडकर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर, उपाध्यक्ष अ‍ॅड. विलासराव पोहंडूळकर, सहसचिव अ‍ॅड. संजय देशपांडे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी गोविंद मोरे, संस्थेचे सदस्य पवनकुमार झांजरी, एम. जी.…

Read More

*पॉक्सो जनजागृती शिबिरातून सजग समाजाचा संदेश* परभणी,(प्रतिनिधी)  : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ (POCSO)’ या विषयावरील जनजागृती प्रशिक्षण शिबिर श्री शिवाजी विधी महाविद्यालयात आज संपन्न झाले. बालकांच्या सुरक्षिततेबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात न्यायव्यवस्था, पोलीस, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संजय ए. देशमुख हे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एम. सादराणी अध्यक्षस्थानी होते.…

Read More

परभणी,( प्रतिनिधी)  : शेगावहून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पायी पालखीचे परभणी शहरात भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दत्तधाम येथे परभणी महानगरपालिकेच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने स्वच्छता, आरोग्य सेवा आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी विशेष नियोजन केले होते. दत्तधाम ते वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मोंढा आणि रोकडे हनुमान मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालखी मार्गावर स्वच्छता कर्मचारी व घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी (दि. 4) परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी भक्तिमय वातावरणात उत्साहाने स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. पालखी मार्गावरील विविध गावांमध्ये ग्रामस्थ व भाविकांनी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले. वारकर्‍यांसाठी महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची तसेच वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. पालखीच्या दर्शनासाठी मार्गावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पालखीसोबत मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी, मृदंगवादक आणि पताकाधारी सहभागी झाले होते. अखंड हरिनाम, भजन-कीर्तन आणि अभंग गायनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने वारीत सहभाग…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : शिवसेनेला राजकीय मान्यता आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवून देण्यात परभणी जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढविणार असल्याचे प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केले. शनिवारी (दि. 4) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, माणिक पौंढे आणि प्रवीण देशमुख उपस्थित होते. खासदार जाधव म्हणाले की, आपली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कायम बांधिलकी राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेऊनच मागील 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की,…

Read More

परभणी, (-आषाढी वारी पालखी सोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षित, सुखकर आणि सुविधायुक्त प्रवासासाठी व्यापक नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी विविध विभागांना समन्वयाने काम करून वारकऱ्यांना आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशव्दारे सूचित केले आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस विभागप्रमख उपस्थित होते. जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून पंढरपूरकडे जाणाऱ्या सुमारे 43 दिंड्या परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहेत. दि. 4 जुलैपासून प्रमुख दींड्या परभणी जिल्हयात दाखल होणार आहे. तर दि. 17 जुलैपर्यंत विविध दिंड्यांचे आगमन सुरू राहणार आहे. श्रीक्षेत्र त्रिधारा, रोकड हनुमान मंदिर (नवा…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा काळे, झाडगाव आणि उखळद येथे अवैध देशी दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली. या कारवाईत चार आरोपींविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा काळे येथे आरोपी प्रकाश ग्यानु जाधव याच्याकडून मंगळवारी अवैध देशी दारूच्या 50 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शरद डोंबे करीत आहेत. दुसर्‍या कारवाईत झाडगाव येथील आरोपी प्रल्हाद बाबुराव सूर्यवंशी (देशमुख) याच्याकडून अवैध देशी दारूच्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलीस कर्मचारी नामदेव सुजलोड यांच्या फिर्यादीवरून…

Read More

परभणी (प्रतिनिधी) मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वर्धापन दिनानिमित्त 26 जुलै 2026 रोजी येथील शुभमंगल मंगल कार्यालयात मराठवाड्यातील उद्योजक व नवीन उद्योग करणाऱ्यांना युवकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभमंगल मंगल कार्यालय पाथरी रोड परभणी येथे सकाळी दहा वाजता मराठवाडा विभागीय उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री सौ.मेघना साकोरे (बोर्डीकर) तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंञी बाबासाहेब पाटील तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र जाधव हे राहणार आहेत…

Read More

परभणी,( प्रतिनिधी) पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दांपत्यांना IVF उपचारांचा लाभ शासकीय योजनेतून मिळावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सभागृहात करताच आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत IVF उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची घोषणा केली. पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार राहुल पाटील यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला.ते म्हणाले,आजच्या काळात अनेक कुटुंबांसाठी IVF ही नितांत गरज बनली आहे. मात्र उपचारांचा प्रचंड खर्च सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अनेकांचे पालकत्वाचे स्वप्न अपूर्ण राहते.त्यामुळे शासनाने राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दांपत्यांना IVF उपचारांचा लाभ शासकीय योजनेतून मिळावा अशी मागणी केली. यावर आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांनी…

Read More