Author: Lok Sanchar

परभणी (प्रतिनिधी) असोला गाव पांदणमुक्त होण्याच्या औचित्याने असोला ते परभणी पांदण रस्त्याचे लोकार्पण भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष  शिवाजी भरोसे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या विकासकामांतर्गत असोला–परभणी, असोला–मुरुंबा, असोला–कारेगाव, मुरुंबा रोड ते गट क्र. २२७ तसेच तट्टूजवळील पांदण ते नागोराव भरोसे यांच्या शेतापर्यंतच्या मार्गांसह असोला गावातील सर्व पांदण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामांमुळे असोला गाव अधिकृतपणे पांदणमुक्त झाले आहे. या कार्यक्रमास सरपंच  उमाकांत भरोसे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष. दशरथ जावळे, माजी उपसरपंच. व्यंकटी जावळे, पोलीस पाटील. पंढरी रिक्षे, ग्रामपंचायत सदस्य. पांडुरंग जावळे, बाळासाहेब जावळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. असोला गावातील सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या पांदण…

Read More

परभणी, (प्रतिनिधी): भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यास २ जुलै ते ३ जुलै २०२६ या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) अनुराधा ढालकरी यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आकाशात वीज चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराच्या बाल्कनीत, छतावर अथवा उघड्या जागेत थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे सुरू असल्यास ती तातडीने बंद करावीत. तसेच तारेचे…

Read More

परभणी (प्रतिनिधी) श्री सत्य साई सेवा संघटना वतीने श्री सत्य साई बाबांच्या दिव्य ज्योतीचे प्रशांती निलयम पुट्टपरती आंध्र प्रदेश येथून परभणी जिल्ह्यात स्वामीच्या प्रेम ,सेवा, एकता व अध्यात्मिक जागृतीचा संदेश घेऊन पवित्र दिव्य ज्योत दिनांक ३ रोजी आगमन होत आहे .श्री सत्य साई दिव्य ज्योती स्वागत कार्यक्रम दिनांक ३ जुलै रोजी सायं ७ ते ८-४० परभणी शहरातील वसमत रोड डॉ शेळके -निवास सत्संग हॉल येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही ज्योत केवळ एक दीप नसून स्वामीचे प्रेम , एकता ,सेवा आणि अध्यात्मिक जागृतीचा संदेश घेऊन प्रवास करत आहे. पवित्र उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी उत्साहात सहभागी व्हावे.श्री सत्य साई बाबांच्या…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ (पोक्सो कायदा) या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. ५ जुलै २०२६ (रविवार) रोजी सकाळी १० वाजता श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संजय ए. देशमुख हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांमध्ये पोक्सो कायद्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात पोक्सो कायद्याच्या तरतुदी, बालकांचे हक्क, लैंगिक अत्याचार…

Read More

 परभणी (प्रतिनिधी)  – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्हयात आजपासून (३० जून) मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळून पाहणार आहेत. बीएलओ भेटीदरम्यान नागरिकांनी गणना अर्ज आवश्यक माहिती भरून स्वाक्षरीसह परत द्यावा व पोच घेऊन अर्जाची एक प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी. तरी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांनी केले आहे. कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही या उद्दिष्टाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,…

Read More

परभणी: (प्रतिनिधी)  : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक १,१५३.६० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकारामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा हा निर्णय प्रत्यक्षात साकार…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) ९५ टक्के ब्लॉकेज असलेल्या ७० वर्षीय वृद्धावर बायपास न करता ‘ यशस्वी मोफत कटिंग बलून’द्वारे  शस्त्रक्रिया करुन जिवनदान दिल्याची किमया ‘आर. पी. हॉस्पिटलने साधली आहे. ग्रामीण भागातील एका ७० वर्षीय पुरुष रुग्णाला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना तातडीने परभणी जवळील आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या  ‘आर. पी. हॉस्पिटल’ मध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रुग्णालयात आणताच डॉक्टरांनी तत्परतेने त्यांचा ईसीजी (ECG) काढला, ज्यामध्ये हृदयविकार संबंधी गंभीर बदल दिसून आले. आर. पी. हॉस्पिटलच्या अत्याधुनिक कार्डिओलॉजी विभागातील तज्ज्ञ व अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. दीपक कुबडे यांनी रुग्णाचा ‘टू-डी इको’ (2D Echo) केला. रुग्णाची गंभीर अवस्था पाहता, त्यांना…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात दि. ३० जूनपासून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणीची मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून यंदा दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बीएलओंना मागील आठवडाभरापासून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. यावेळी निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह चव्हाण तसेच जनसंपर्क अधिकारी गणेश शिंदे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, एसआयआरचा मुख्य उद्देश पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे आणि अपात्र मतदारांची नावे…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : वाढते ताण-तणाव, नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेता समाजाला प्रशिक्षित व संवेदनशील समुपदेशकांची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारीज परभणी केंद्राच्या संचालिका राजयोगिनी बी.के. अर्चना दीदी यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू), नाशिक तथा राजयोग एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च फाऊंडेशन (शिक्षा प्रभाग), माऊंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘अँडव्हान्स डिप्लोमा इन कौन्सिलिंग अ‍ॅन्ड मानसिक आरोग्य’ या शिक्षणक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, प्रमाणपत्र वितरण व सन्मान सोहळा ब्रह्माकुमारीज, ओम निवास, वसमत रोड, परभणी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.के. अर्चना दीदी होत्या. यावेळी बी.के. सीमा दीदी, प्रा. बी.के. विकास एल. साळुंखे, डॉ. जगदीश नाईक, विजय…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र हा उद्देश साध्य व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकांसाठी व्यापक अन्न सुरक्षा अनुपालन आदेश जारी केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 24 जून 2026 रोजी हा आदेश जारी केला असून राज्यातील सर्व खाद्य व्यावसायिकांना त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, स्वीट मार्ट, बेकरी, केटरिंग आस्थापना तसेच इतर सर्व खाद्य व्यवसायांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायस्थळी…

Read More