परभणी (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार दिनांक 28 जून रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजता जाहीर सभा होत आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्या त्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे शिवसेनिकांना बळ देत आहेत. उद्धव ठाकरे हे हिंगोली येथून परभणीत शनिवारी सायंकाळी मुक्कामी येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 28 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे जाहीर सभा होत आहे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार संजय जाधव यांनी ‘ऑपरेशन टायगर’मध्ये बंडखोरी केल्यानंतर…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे, परीक्षा प्रक्रीया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, दि. २७ जून २०२६ रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली. या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य…
परभणी, (प्रतिनिधी,)राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार सतीश रेड्डी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, सहायक महसूल अधिकारी आबेदखॉ पठाण, सहायक महसूल अधिकारी सुरेश पुंड, महसूल सहाय्यक विश्वनाथ कनके तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ***
परभणी (प्रतिनिधी)कारेगाव येथील वसंत अनु जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आज राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक मुख्याध्यापिका गीता लेडे मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राम गारकर, शंकर रोडे हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जुनघरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय इंगळे अंबादास रेडेवाड गजानन मुडे गणेश निर्वळ सुनील कचवे निलेश यादव मोतीराम कराळे संस्था प्रतिनिधी बबनराव धाडवे एकनाथ आवचार राजू राठोड इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन श्री विष्णू मोपकर…
परभणी, (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९६-परभणी विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यासोबतच एका बॅचचे प्रशिक्षण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीनेही पार पडले. प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, निवडणूक नायब तहसीलदार सुनील कांबळे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ सुपरवायझर, नोडल अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यपद्धती, घरभेटींचे नियोजन, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर तसेच भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले…
संभाजीनगर, अकोला व आदिलाबादहून पंढरपूरसाठी अतिरिक्त गाड्यांची आवश्यकता परभणी,दि.26(प्रतिनिधी) : पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त मराठवाड्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असतात. यंदाचा आषाढी एकादशी सोहळा 25 जुलै रोजी होत असल्याने वारकर्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन 20 ते 30 जुलैदरम्यान छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि आदिलाबाद येथून विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. यासंदर्भातील निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आषाढी एकादशीसाठी मराठवाड्यातून लाखो भाविक आणि वारकरी पंढरपूरला जातात. सध्या धावणार्या निजामाबाद-पंढरपूर रेल्वेगाडीव्यतिरिक्त अतिरिक्त तीन विशेष गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. या…
परभणी,(प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता उद्योजकतेकडेही वाटचाल करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून राष्ट्रहित व समाजहितासाठी योगदान देणे आवश्यक असून विकसित भारताच्या निर्मितीत युवाशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधीर राजूरकर यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), परभणी महानगराच्या वतीने शारदा महाविद्यालयातील स्व. हेमराजजी जैन सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘छात्रोदय – नव छात्र नेतृत्वाचा उदय’ गुणवंत विद्यार्थी सत्कार व महानगर कार्यकारिणी घोषणा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात परभणी शहरातील विविध शाळांमधील 93 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगराध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण राठोड यांनी केले. गुणवंत…
परभणी : पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने परभणीचे मा. पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत. तसेच आता तर लोकप्रतिनिधीही पत्रकारांना धमक्या देत आहेत. ही लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना त्यांना शिवीगाळ केली तसेच असभ्य भाषेत बोलून धमकी दिली आहे. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारे वागत असतील…
परभणी, (प्रतिनिधी) प्राथमिक शिक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चे आयोजन दि. 28 जून रोजी परभणी शहर व परिसरातील विविध केंद्रांवर करण्यात आले आहे. पेपर-1 साठी 17 केंद्रांवर 5,807 तर पेपर-2 साठी 23 केंद्रांवर 7,287 परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा पारदर्शक, निकोप व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षार्थींना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी पेपर-1 साठी सकाळी 8.30 वाजता आणि पेपर-2 साठी दुपारी 12.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर आधार बायोमेट्रिक पडताळणी व फ्रीस्किंग करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रासाठी 10.10 वाजल्यानंतर तसेच दुपारच्या सत्रासाठी 2.10…
परभणी, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने”चा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक मोबाईलशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भाग्यश्री मुंडे यांनी केले आहे. शासनाच्या २ जून २०२६ च्या निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या या योजनेत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांपैकी ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत व ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेली मुद्दल व व्याजासह कमाल २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जमाफीस पात्र राहणार आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना किंवा महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती…

