Author: Lok Sanchar

परभणी, (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी, परभणी महानगर यांच्या वतीने हॉटेल चतुर्थी, परभणी येथे ‘मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याण’ तसेच २५ जून ‘काळा दिवस’ निमित्त लोकतंत्र सेनानी सत्कार कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. त्यानंतर आणीबाणी व मोदी सरकारची १२ वर्षे या विषयावरील प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी केले. प्रमुख वक्ते श्री. मनोज पांगारकर यांनी १९७५ च्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर झालेल्या आघाताचा, संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी लोकतंत्र सेनानींनी दिलेल्या संघर्षाचा इतिहास प्रभावीपणे उपस्थितांसमोर मांडला. अभियानाच्या संयोजिका सौ. मंगलताई मुदगलकर यांच्या…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, परभणी महानगर यांच्या वतीने हॉटेल चतुर्थी, परभणी येथे ‘मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याण’ तसेच २५ जून ‘काळा दिवस’ निमित्त लोकतंत्र सेनानी सत्कार कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. त्यानंतर आणीबाणी व मोदी सरकारची १२ वर्षे या विषयावरील प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी केले. प्रमुख वक्ते श्री. मनोज पांगारकर यांनी १९७५ च्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर झालेल्या आघाताचा, संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी लोकतंत्र सेनानींनी दिलेल्या संघर्षाचा इतिहास प्रभावीपणे उपस्थितांसमोर मांडला. अभियानाच्या संयोजिका सौ. मंगलताई मुदगलकर…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय परभणी यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुदान, बीज भांडवल व थेट कर्ज योजनांअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्यालयाकडून परभणी जिल्ह्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत १५, बीज भांडवल योजनेअंतर्गत १५ आणि थेट कर्ज योजनेअंतर्गत ३० अशा एकूण ६० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mahadisha.mpbcdc.in येथे ऑनलाइन अर्ज सादर करावेत तसेच जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, आवश्यकतेनुसार प्रकल्प…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बुधवार 24 जून रोजी परभणी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले. सकाळपासून जिल्ह्यात विविध भागांत पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी सुमारे दहाच्या सुमारास परभणी शहरासह सेलू आणि जिल्ह्यातील इतर अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर काही भागांत जोरदार सरी बरसल्या. सायंकाळपर्यंतही रिमझिम पावसाची हजेरी कायम होती. मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी बुधवारी परभणी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तसेच पुढील शनिवार (दि. 27 जून) पर्यंत येलो अलर्ट देण्यात आला…

Read More

परभणी, (प्रतिनिधी): परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत तसेच सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील आरोग्य विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रस्तावांच्या आढावा बैठकीचे आयोजन एमएसआरडीसी कार्यालय, निर्मल भवन, मुंबई येथे करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री मेेेघना साकोरे-बोर्डीकर होत्या. बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन, ५० खाटांच्या नशामुक्ती केंद्राची उभारणी, विविध आरोग्य संस्थांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (ओ.टी.), मॉड्युलर लेबर रूम आणि अन्य अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून दर्जोन्नती, सेलू येथे अत्याधुनिक कॅथलॅब स्थापन करणे…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात वाढत्या बोगस डॉक्टरांच्या समस्येचा मुद्दा परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करत अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवश्यक ती कारवाई करण्याबरोबरच तपासणी समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्याचे आश्‍वासन दिले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी हा प्रश्‍न उपस्थित करताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले की, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून अनेकजण कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत परवाना नसताना ग्रामीण भागात सर्रास वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. अशा व्यक्तींकडून रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार केले जात असून नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी…

Read More

परभणी (प्रतिनिधी)ः परभणी येथील  आ.डॉ.राहुल पाटील यांच्या ‘परभणी मेडिकल कॉलेज, आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत परभणी वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख राष्ट्रीय स्तरावर नेवून परभणी शहरासाठी नावलौकिक मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्लिनिकल ट्रायल्स(जागतिक वैद्यकीय संशोधन) दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील एमबीबीएस (MBBS) विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पंचम आल्हाट, अंजली पवार आणि योगेश ननकानी या विद्यार्थ्यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. देशातील विविध राज्यांतील ७२ वैद्यकीय महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये या संघाने द्वितीय स्थान मिळविले. ही राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्ध्येत विद्यार्थ्यांची तयारी आणि त्यांचा सहभाग यासाठी परभणी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांच्या ऐवजी ग्रामविकास पंचायतराज विभागातील सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत महाजन यांनी आज मंगळवार 23 जून रोजी एका अध्यादेशाद्वारे नव्या पालक सचिवांची नियुक्ती केली. तुकाराम मुंडे हे या जिल्ह्यात पुर्वी पालक सचिव म्हणून नियुक्त केल्या गेले होते. परंतु, नियुक्तीपासून ते आजतागायतपर्यंत ते या जिल्ह्यात दाखल झालेच नाहीत. आज ना उद्या ते येतील म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तूळाचे त्यांच्या दौर्‍याकडे लक्ष लागले होते. दुर्देवाने मुंडे यांच्या नियुक्तीपासूनच्या पहिल्या दौर्‍यापूर्वीच सामान्य प्रशासन विभागाने डॉ. पुलकुंडवार यांच्या नियुक्तीचा आदेश दिला. यज्ञटंट्

Read More

परभणी, ( प्रतिनिधी) ) : मानवत तालुक्यातील यशवाडी येथे देवस्थान परिसरातील सभा मंडप कोसळून पाच जणांचा मृत्यू आणि १८ जण गंभीर जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेबाबत कठोर पावले उचलली आहेत. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व देवस्थाने, धार्मिक स्थळे, सभा मंडप व सार्वजनिक वापराच्या संरचनांसाठी सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक निर्देश जारी केले असून बांधकाम पूर्ण होऊन सक्षम स्थापत्य अभियंत्याकडून स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच नागरिकांना प्रवेश देण्यात यावा. सदरील सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन समिती, ट्रस्ट अथवा बांधकाम संस्था यांना झालेल्या दुर्घटनेस जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्याविरुद्ध…

Read More

‘एकल महिला’ नव्हे, ‘पूर्णागिणी’ : जिल्हाधिकारी यांचा सकारात्मक विचारांचा संदेश* परभणी, (प्रतिनिधी) : महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने आयोजित ‘एकल महिला धोरण’ विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेला विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, एकल महिला प्रतिनिधी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी प्रभावी व सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. कार्यशाळा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर तसेच महिला व बाल विकास समितीच्या सभापती ऐश्वर्या अजयराव चव्हाण उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले…

Read More