परभणी, (प्रतिनिधी) मानवत तालुक्यातील यशवाडी येथील श्री हनुमान मंदिर, येथे २० जून रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील सभा मंडप कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण २५ लाख रुपये आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी, परभणी यांना पाठविलेल्या पत्रानुसार या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या संतोष गडदे, आकाश सुरजोसे, नुमेश अगरवाल, सूरज कोपरटकर, श्रीकृष्ण गवारे यांच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर मदतीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यातून स्टेट बँक ऑफ इंडिया,…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत सईद खान शेरगुल खान हे विजयी झाले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक रूचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूणा संगेवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दि. 18 जून रोजी या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर 466 पैकी 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मतमोजणी आज कडेकोट बंदोबस्तात तसेच शांततेत व सुरळीत पार पडली. आज झालेल्या मतमोजणीनंतर सईद खान शेरगूल खान (पक्ष-शिवसेना)…
परभणी, (प्रतिनिधी) :-महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक २ जून २०२६ च्या शासन निर्णयान्वये “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना” राबविण्यात येत आहे. शासन निर्णयान्वये राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक हा चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था भाग्यश्री मुंडे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची…
परभणी, (प्रतिनिधी) :-महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार दि. २३ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर “एकल महिला दिवस” साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद, परभणी येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शासनस्तरावर एकल महिला धोरण तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर एकल महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिला स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्या तसेच संबंधित व्यक्तींनी धोरणाबाबत सूचना व अभिप्राय सादर करण्यासाठी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एकल महिलांसाठी काम करणाऱ्या इच्छुक…
परभणी, (प्रतिनिधी) :”बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे” विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, परभणी यांच्या वतीने तसेच सवंडकर मॅथ्स क्लासेस, परभणी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आज महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनेश कोकारे, डॉ. महेश पाटील व डॉ. किरण सानप…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी 465 पैकी पहिल्या पसंती क्रमांकाचे सर्वाधिक 242 मते मिळवून विजय पटकाविला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 22 जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व निरीक्षक रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यावेळी निवडणूक रिंगणातील प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजण्यात आली. त्यात एकूण 465 मतापैकी पहिल्या पसंती क्रमांकाचे सर्वाधिक म्हणजे 242 मते महायुतीचे उमेदवार खान यांनी पटकावले त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांना 159 म्हणजे दुसर्या क्रमांकाचे तर अपक्ष उमेदवार सुशिलभैय्या देशमुख यांना 56 मते मिळाली. ते तीसर्या क्रमांकावर राहिले. एकूण मतदानात 8…
परभणी, ( प्रतिनिधी) यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून करण्यात आलेल्या बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमी नागरिकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच उपचारांबाबत डॉक्टर आणि प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली. जखमींना कोणत्याही प्रकारचा विलंब न होता तातडीने आणि सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी प्रभावित कुटुंबियांसोबत शासन व…
परभणी, (प्रतिनिधी) : योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली आहे. या संदेशाचा प्रसार करत प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे १२ वा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, योग साधक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सामूहिक योगासने करून आरोग्यदायी जीवनाचा संकल्प केला. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, महानगरपालिका, मेरा युवा भारत आणि जागतिक योग उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या जागतिक योग दिनाची संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी असून त्यानुसार योगाचे आरोग्यदायी…
परभणी (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांचा पक्ष असलेली शिवसेना सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. शिवसेनेने रस्त्यावरच्या अनेक लोकांना मोठा केलं.ते लोक निघून जात आहेत. कुणी कुठे गेले तरी शिवसेनेला आणि सामान्य शिवसैनिकाला काही फरक पडणार नाही, आपण एकसंघ राहून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं, आपण आपली ताकद दाखवून द्यायची असा निर्धार आमदार पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या शनिवारी परभणीत मुक्कामी येणार आहेत. रविवार दिनांक 28 जून रोजी अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. यानिमित्त रविवार दिनांक 21जून रोजी आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी…
परभणी (प्रतिनिधी) मानवत तालुक्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिरात बांधकाम सुरू असलेल्या सभागृहाचे छत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर परभणी येथील आर.पी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आ.डॉ.राहुल पाटील यांनी आरपी हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्म उपस्थित होते त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून धीर दिला. दुर्घटनेतील जखमींना आवश्यक ते सर्व उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल तसेच पीडितांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार…

