परभणी,(प्रतिनिधी) : युवक कार्यकर्ते महेश बीडगर यांना केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीकरीता सकल धनगर समाजाच्या वतीने शनिवारी गंगाखेडात मोठा मोर्चा काढण्यात आला. संतप्त मोर्चेकर्यांनी या घटनेतील सूत्रधारास अटक करावी, पोलिस अधिकार्यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. युवक कार्यकर्ते बीडगर यांना काहींनी 7 जूलै रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यातून बाहेर आणून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमानुष मारहाण केली. त्यानंतर बीडगर यांच्या विरुध्दच पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये अॅट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले, असे या मोर्चेकर्यांनी नमूद करीत बीडगर यांच्या विरुध्दचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा, घटनेदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित पोलिस अधिकार्यांविरुध्द कठोर कारवाई करावी, तसेच…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील कामाला मोठी गती मिळाली आहे. शनिवार (11 जुलै) रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 15 लाख 41 हजार 7 मतदारांपैकी 12 लाख 40 हजार 211 (80.48 टक्के) गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी वितरित केले आहेत. तसेच 3 लाख 23 हजार 224 (20.97 टक्के) फॉर्मचे डिजिटायझेशन, तर 3 लाख 22 हजार 449 (20.92 टक्के) फॉर्मची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. मोहिमेचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या एकूण 21 संचालक पदांपैकी 13 संचालक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 8 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 19 जुलै रोजी मतदान तर 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातील पूर्णा मतदारसंघातून नंदकुमार डाखोरे यांना ऑटोरिक्षा, तुळशीराम बोबडे यांना कपबशी, मानवत मतदारसंघातून अमोल कदम यांना ऑटोरिक्षा व आकाश चोखट यांना कपबशी, हिंगोली मतदारसंघातून राजामती मुटकुळे यांना कपबशी, रमेश शिंदे यांना छत्री व गुलाबराव सरकटे यांना कपाट, तर वसमत मतदारसंघातून तुषार जाधव यांना अंगठी आणि…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील जूना पेडगांव रस्त्यावरील विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरीक श्रीमती जानकीबाई भाऊसाहेब कुलकर्णी यांचे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता वृध्दापकाळामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुली, सहा मुले, जावई, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील वैद्यकीय प्रतिनिधी तथा भारतीय जनता पार्टीचे नेते संजय कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.त्यांना दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
परभणी ( प्रतिनिधी)परभणी-हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान यांचे वडील तथा पाथरी येथील ज्येष्ठ नागरिक शेरगुल खान यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शेरगुल खान हे अत्यंत साधी राहणी, शांत स्वभाव, सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. दरम्यान त्यांच्यावर उद्या (रविवार) दुपारी 2 वाजता पाथरीत मुस्लिम धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शेरगुल खान यांच्या पश्चात पाथरीचे नगराध्यक्ष आसिफ खान, विधान परिषदेचे आमदार सईद खान, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मेहराज खान, तसेच तीन मुले, सुना, नातवंडे आणि असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
परभणी, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय परभणी अंतर्गत मुख्य महामंडळासह १३ उपमहामंडळांच्या माध्यमातून लघुउद्योग, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. जिल्हा कार्यालयांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळासह जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ, संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार…
परभणी, (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली सहायक मतदार नोंदणी अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व पत्रकारांची मार्गदर्शन बैठक झाली. बैठकीत भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. बीएलओमार्फत ३० जून ते २९ जुलै या कालावधीत घरभेटीद्वारे गणना फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व पात्र मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन करण्यात…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी व विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरावर कठोर कारवाई करून महापौरांना योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, 9 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान परभणी महानगरपालिकेतील महापौर दालनात शेख रफिक नामक व्यक्तीने महापौर सय्यद इकबाल यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण तसेच सुरक्षा रक्षक यांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.…
परभणी,(प्रतिनिधी) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी (एमसीवाय) वाहनांसाठी लवकरच एमएच-22-बीएम ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यात विहित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांच्या नावे कार्यालयात दि. 10 ते 13 जुलै 2026 या कालावधीत दुपारी 2.30 पर्यंत खिडकी क्र. 11 सहा. रोखपाल यांच्याकडे जमा करावेत असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. नविन नोंदणी वितरकांच्या स्तरावर होत असल्यामुळे लिलाव दिनांकात व सिरीज सुरु करण्याच्या दिनांकात बदल करण्याचे पूर्ण अधिकार या कार्यालयाकडे राहील. एका पसंती क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यासच लिलाव घेण्यात येईल.…
परभणी,प्रतिनिधी) : शहरातील मातोश्री नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 93 हजार 423 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनराव बापुराव कदम (वय 74, रा. मातोश्री नगर, परभणी) हे आपल्या मुलगी सोनाली कदम यांच्यासह 1 जुलै रोजी घराला कुलूप लावून सातारा येथे मुलाखतीसाठी गेले होते. त्यानंतर ते पुणे येथे मुलाकडे मुक्कामी राहिले. 6 जुलै रोजी सकाळी किशनराव कदम हे परभणीतील घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरात प्रवेश करून…

