परभणी, (प्रतिनिधी) ) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणे हा आहे. साहित्य किंवा कला क्षेत्रात आयुष्य समर्पित केलेल्या आणि सध्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पात्र साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग अर्जदारांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता देण्यात आली असून, त्यांच्यासाठी किमान वय…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी आज (१४ जुलै) पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यापूर्वी प्रशासनाला अनेक निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. उपोषणकर्त्यांनी कुलगुरू, वनामकृवी प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ न देण्याबाबत आश्वासन मागण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने अखेर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये भरती प्रक्रियेला मुदतवाढ न देणे, वनामकृवी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांना…
परभणी :(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी ₹३६,५८५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष. शिवाजी भरोसे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांचेही शेतकरी हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय साकार करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. शिवाजी भरोसे म्हणाले की, महायुती…
परभणी, ( प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजने (2026-27) अंतर्गत परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती लता वाकळे, विधान परिषद सदस्य सईद खान, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा नियोजन अधिकारी…
परभणी ( प्रतिनिधी )शहरातील लोकमान्य नगर येथील जेष्ठ नागरिक शांताबाई भानुदासराव बोरुळ (वय ९५) यांचे दिनांक१३जुलै रोजी सकाळी ७ वाजता निधन झाले जिंतूर रोड येथील अमरधाम स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले , एक मुलगी तीन सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय स्टेट बँकेचे सेवा निवृत्त अधिकारी किशोर बोरूळ तसेच चंद्रकांत बोरूळ, पत्रकार दिलीप बोरूळ यांच्या त्या मातोश्री होत.
परभणी,(प्रतिनिधी) : दिल्लीतील भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात सोमवार 13 जूलै रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठविण्यात आले. त्याद्वारे, नाझिया इलाही खान यांनी विविध जाहीर सभा तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमधून इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या विधानांमुळे देशभरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली असून धार्मिक…
परभणी(प्रतिनिधी) : रेल्वे सुरक्षा बलाच्या नांदेड विभागाने जून 2026 महिन्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या विविध विशेष मोहिमांमधून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. रेल्वे मालमत्तेचे संरक्षण, हरविलेल्या व्यक्ती व मालमत्तेचा शोध, महिला प्रवाशांना सुरक्षा व सहाय्य, तसेच रेल्वे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमांना चांगले यश मिळाले आहे. रेल्वे सुरक्षा बलाने ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत तीन अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका करून त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. ‘अमानत’ मोहिमेद्वारे हरविलेल्या मालमत्तेच्या दहा प्रकरणांमध्ये तब्बल 2 लाख 5 हजार 500 रुपयांची मालमत्ता शोधून संबंधित प्रवाशांना परत करण्यात आली. ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत प्रवाशांच्या सामान चोरीच्या 17 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. या कारवाईत 22 संशयितांना…
प्रशिक्षण कार्यक्रम ; विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा परभणी, (प्रतिनिधी)– लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभागात असणाऱ्या बीएलओंना एसआयआर च्या कामात सहकार्य करून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पूनरिक्षण जनजागृतीचे काम हाती घ्यावे. मतदार यादी सखोल पुनरीक्षण जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची साथ महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Summary Revision – SSR/SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवाजी महाविद्यालयात विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वंयसेवक विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक यांच्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादी विशेष…
परभणी, (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.)मार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून २४ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य मिळवून ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. शिष्यवृत्तीचे वितरण मुख्यालय, मुंबई यांच्याकडून उपलब्ध निधीनुसार गुणवत्तेच्या क्रमाने करण्यात येणार आहे. अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्यांचा जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड व रेशन कार्डच्या छायाप्रती, गुणपत्रिका, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे तसेच बोनाफाईड प्रमाणपत्र…
परभणी ( प्रतिनिधी) दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची पंजाब मधील कपूरथला येथील सरदार स्वर्णसिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालक पदी आगामी तीन वर्षासाठी निवड झाली आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये महासंचालक पदी निवड झाल्याने कोकण कृषी विद्यापीठाच्या शीरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महत्वपूर्ण निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी डॉ. अतुल मोहोड यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्था ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत असणारी अत्यंत नामांकित संस्था आहे. ही…

