परभणी (प्रतिनिधी) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुस्लिम पत्रकार बांधवांसाठी इफ्तार पाटीर्चे आयोजन दि. १९ मार्च 2025 रोजी येथील स्टेडियम परिसरातील अतिथी हॉटेल मध्ये करण्यात आले होते. सदरील इफ्तार पाटीर्साठी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी हजेरी लावली. त्याच प्रमाणे मोठया संख्येने पत्रकार संघाचे पदाधिकारी व शहरातील मुस्लीम नागरिक उपस्थित होते. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून यावर्षी कडक उन्हाळ्यामध्ये 2 मार्चपासून रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे 30 दिवस संपूर्ण महिनाभर मुस्लिम धर्मीय रोजा उपवास राहून या महिन्यांमध्ये विविध धार्मिक विधी व नमाज पठण करून अल्लाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात.पहाटे पाच वाजता जेवण (सहेर)करून उपवासाची सुरुवात होते दिवसभर अन्नाचे…
Author: Lok Sanchar
परभणी :(प्रतिनिधी) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुस्लिम पत्रकार बांधवांसाठी इफ्तार पाटीर्चे आयोजन दि. १९ मार्च 2025 रोजी येथील स्टेडियम परिसरातील अतिथी हॉटेल मध्ये करण्यात आले होते. सदरील इफ्तार पाटीर्साठी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी हजेरी लावली. त्याच प्रमाणे मोठया संख्येने पत्रकार संघाचे पदाधिकारी व शहरातील मुस्लीम नागरिक उपस्थित होते. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून यावर्षी कडक उन्हाळ्यामध्ये 2 मार्चपासून रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे 30 दिवस संपूर्ण महिनाभर मुस्लिम धर्मीय रोजा उपवास राहून या महिन्यांमध्ये विविध धार्मिक विधी व नमाज पठण करून अल्लाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात.पहाटे पाच वाजता जेवण (सहेर)करून उपवासाची सुरुवात होते दिवसभर अन्नाचे…
परभणी,(प्रतिनिधी) : महिलांच्या खर्या अर्थाने सशक्तीकरणासाठी ठोस धोरणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीमती फौजिया खान यांनी राज्यसभेत व्यक्त केले. केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या कार्यपध्दतीवर कठोर टीका करतेवेळी श्रीमती खान यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या केवळ घोषणाबाजीवरच सरकार भर देत आहे. प्रत्यक्षात महिलांचे आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीत मूलभूत सुधारणा होत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. मातृ मृत्यू दराची स्थिती भयावह आहे. सध्या भारतात एमएमआरचा दर 97 प्रति 1 लाख जिवंत जन्म आहे. जो यु.एन.ने निश्चित केलेल्या 70च्या टार्गेटपेक्षा जास्त आहे. आसाम, मध्यप्रदेश या ठिकाणची स्थिती तर आणखीन गंभीर आहे. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातसुध्दा अनेक त्रुटी आहेत. विशेषतः वाहने अपुरी आहेत.…
परभणी (प्रतिनिधी) सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती नविन पिढीला व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे,मा. मुख्यमंत्री, यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मवर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानोपासक मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय परभणी या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका,पोवाडे, नृत्य व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात नाट्यप्रवेश श्री प्रमोद शेलार व त्यांच्या संघांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले.शाहीर…
पालम(प्रतिनिधी)कर आकारणीच्या निषेधार्थ परभणी जिल्हयातील बीआर बार व परमीट रुम 20 मार्चला बंद रहानार आहे. हॉटेल असोसिएशनचा सरसकट दहा टक्के व्हॅट आकारणीला विरोध परभणी महाराष्ट्रातील मद्य विक्रेते 20 मार्च रोजी आपले बीआर बार बंद करून सरकारकडून होत असलेल्या कर वाढीच्या निषेधार्थ आपला निषेध व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्रातील परमिट धारकांच्या मद्यविक्री वर सरकार कडून सरसकट दहा टक्के अतिरिक्त व्हॅट आकारला जात आहे. हा व्हॅट थेट मद्य उत्पादकांवर आकारला जावा, जेणेकरून शासनाचे उत्पन्न वाढेल, या कर आकारणी निषेधार्थ २० मार्च 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व परमिट रूम व बार बंद राहणार आहेत.तसे ग्रामीण व शहरी भागामध्ये हातगाडे, धाबे, हॉटेल्स येथे अनाधिकृत पणे…
परभणी (प्रतिनिधी) दुसरे विभागीय महसुल आयुक्तालय परभणी येथे तात्काळ कार्यान्वित करावे या मागणीचे निवेदन सावता सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणीच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य.मुख्यमंत्री मा. ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले. सावता सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणीच्यावतीने निवेदनात म्हटले आहे की, परभणी जिल्हा मराठवाड्याचे हदय स्थान असून संतांची पावनभूमी आहे. निजामाच्या काळातील परभणी जिल्हा हा सर्वात जुना असून मराठवाड्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पण आज हा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. या जिल्ह्याला स्वातंत्र्यापासून काहीच मिळालेले नाही. परभणी करानी मोठा संघर्ष करून कृषी विद्यापीठ मिळवले.या ठिकाणी औद्यौगिक व ईलेक्ट्रानिक्स अभियांत्रिकी महाविद्यालय नाही, जिल्ह्यात एकही महाव्हॅली बरोबरच उद्योग धंदे नसल्यामुळे सुशिक्षित…
परभणी, (प्रतिनिधी) परभणी देशाच्या बाहेर आहे का? परभणी शहरातील नागरिक या देशात रहात नाहीत का? योजनांच्या बाबतीत सततचा अन्याय परभणीकरांवरच का? असा घणाघात करत आमदार डॉ.राहुल पाटील यांनी शासनाला विधानसभा अधिवेशनात धारेवर धरत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रश्नांची सरबत्ती केली.यावेळी त्यांनी शासन जाणीवपुर्वक परभणीकरांची अडवणुक करत असल्याचा आरोप केला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ.पाटील यांनी परभणीकरांच्या जिव्हाळ्याच्या मुद्यावर आणि होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला.ते म्हणाले, 2019 मध्ये परभणी महानगरपालिकेसाठी मंजूर करण्यात आलेली समांतर पाणीपुरवठा योजनेची किंमत वाढून 200 कोटी पर्यंत गेली. हा प्रस्ताव का रोखून धरला जात आहे? भूमिगत गटार योजनेची अशीच बोंब झालेली आहे! हे कामही शासनामार्फत जाणीवपूर्वक थांबवण्यात…
परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील मद्य विक्रेते 20 मार्च रोजी आपले बीआर बार बंद करून सरकारकडून होत असलेल्या कर वाढीच्या निषेधार्थ आपला निषेध व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्रातील परंमिट धारकांच्या मद्यविक्री वर सरकार कडून सरसकट दहा टक्के अतिरिक्त व्हॅॅट आकारला जात आहे. हा व्हॅट थेट मद्य उत्पादकांवर आकारला जावा, जेणेकरून शासनाचे उत्पन्न वाढेल, या कर आकारणी निषेधार्थ २० मार्च 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व परमिट रूम व बार बंद राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा बार हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने ,आनंद बाकळे फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स महाराष्ट्र यांनी दिली. ग्रामीण व शहरी भागामध्ये हातगाडे, धाबे, हॉटेल्स येथे अनाधिकृतपणे मद्यविक्री मोठया प्रमाणावर…
परभणी (प्रतिनिधी) आपण समाजाचं देणं लागतो ही गोष्ट लक्षात घेऊन सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन गरजवंतास जमेल तशी मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सामाजिक सलोखा सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी झटणार व्यक्तिमत्व तसेच मागील 14 वर्षापासून आरोग्य सेवा न्यू लाइफ ब्लड बँकेच्या माध्यमातून अविरत देत असताना लाखो जीवन वाचवण्याचे कार्य करत असलेले डॉ.पंकज खेडकर यांना आधार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, बेळगाव नॅशनल एक्सप्रेस गोल्ड स्टार अवॉर्ड 2025 यांनी *आदर्श समाजरत्न* गौरव पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथील प्रदान करण्यात आला कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वंशज डॉ.दिलीप नेवसे सोलापूर , प्रा. डॉ.पांडुरंग पाटील प्रसिद्ध व्याख्याते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील इनायत नगरातील मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिध्दीकी अहेमदी मोहम्मद अब्दुल मजीद व लिपीक बुढण खान महेबुब खान पठाण या दोघांना 18 हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी यांच्या निवासस्थानातून पथकाने 9 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कमही ताब्यात घेतली. या प्रकरणाबाबत माहिती अशी की, तक्रारकर्ता 17 मार्च रोजी पर्यवेक्षक म्हणून त्यांचे वर्गात काम करीत असतांना लिपीक बुढण खान पठाण यांनी त्यांना वर्गात येवून सांगितले की, तुम्हाला माहे एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 या सहा महिन्यांचे प्रलंबित असणारे वेतन मिळाले आहे. त्या वेतनातून 1 महिन्याचे 3 हजार रुपये…

