Author: Lok Sanchar

परभणी, (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) परभणी विभागात बीएस-6 मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बससेवेचे लोकार्पण आज परभणी बसस्थानकात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते थाटात पार पडले. कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संदीपकुमार साळुंखे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळंम, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. जोगदंड, यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि विभाग नियंत्रक सचिन डफळे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रवाशांना या सेवेसाठी शुभेच्छा देत, नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदायक प्रवास करता…

Read More

परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान मंडळाच्या OBC समितीवर विधानमंडळाने आ राजेश विटेकर यांची नियुक्ती केली आहे इतर मागासवर्गीय कल्याण समिती हि इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि त्या अंमलात आणण्यासाठी शिफारसी करते तसेच राज्य सरकारद्वारे OBC समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सूचना देणे. OBC विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह सुविधा, शैक्षणिक कर्जे यांची उपलब्धता आणि अंमलबजावणी तपासणे. शैक्षणिक संस्थांमध्ये OBC विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सवलती आणि त्यांच्या प्रवेशासंबंधी अडचणी सोडवणे. अशा महत्त्वाच्या बाबीसह OBC समाजासाठी आर्थिक विकास प्रकल्प, स्वयंरोजगार योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण यासंबंधी शिफारसी करणे. उद्योग, व्यवसाय आणि शेतीपूरक उपक्रमांसाठी पतपुरवठा आणि…

Read More

पालम (प्रतिनिधी) सगरोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील कर्मयोगी बाबासाहेब देशमुख उर्फ के.ना. यांचे जन्मशताब्दी वर्ष 27 मार्च 25 ते 27 मार्च 26 असा साजरा करण्यात येणार आहे. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांचा जन्म पालम येथील देशपांडे वाड्यात झालेला आहे. बाबासाहेब देशमुख हे अत्यंत शिस्तप्रिय असून सगरोळी जिल्हा नांदेड येथे ग्रामीण भागात शाळा काढून तेथील गोरगरीब जनतेला ज्ञानदानासारखे पवित्र कार्य त्यांनी केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळालेला आहे. दि.२८ मार्च रोजी पालम येथील देशपांडे यांच्या वाड्यात एका भव्य कार्यक्रमात दीप प्रज्वलित जन्मशताब्दी सोहळ्याला सुरुवात करून नरसी ते सगरोळी पर्यंत मशाल(ज्ञानज्योत) नेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मान्यवरांनी बाबासाहेब देशमुख यांनी…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने 6 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे यंदाचे हे 12 वे वर्ष आहे. समस्त परभणीकरांच्या वतीने दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवार 27 मार्च रोजी स्टेशन रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंदिराच्या सभागृहात पूर्व तयारी व नियोजनाच्या दृष्टीने सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे ठरवण्यात आले. प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघणार्‍या या शोभा यात्रेमध्ये प्रभू श्रीराम लल्लाटी सुबक मनमोहक…

Read More

परभणी (प्रतिनिधी) महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला खरा, परंतु बस उपलब्ध नसतील तर या सवलतीचा उपयोग काय असा प्रश्न करत आपण परभणी विभागासाठी 500 बसची मागणी केली होती परंतु केवळ 10 बस देण्यात आल्या आहेत आधीच दुरुस्तीच्या नावाखाली परभणी विभागातून 100 बस कमी केल्या आहेत, किमान त्या तरी पुन्हा द्या अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. आ.डॉ.पाटील यांच्या प्रयत्नातून तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून परभणीला अद्यावत बसपोर्ट मिळाले, या बसपोर्टचे काम 95 टक्के पूर्णत्वाला गेले असून बस स्थानक सुरू झाले आहे, उर्वरित कामासंदर्भात आ. पाटील यांनी शनिवारी पाहणी करून आढावा…

Read More

परभणी (प्रतिनिधी) शहरातील श्री अष्टभुजा देवी मंदिर परिसरातील जुन्या नावाचे फलक संभाजी रोड असे अर्धवट नाव काढुन त्याठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे नामकरण फलक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणी विभागाच्या माध्यमातून लावण्यात आले. याप्रसंगी राम कुलथे, माऊली कोपरे,विष्णू पंत खलीकर,आश्रोबा घाडगे, दिलीप जाधव, अंकुश नायक, श्रीकांत शिंदे, गोपाळ कदम, शंकर जाधव, अनिल शिंदे, ओमप्रकाश कदम, श्रीहरी महींद्रकर, वैभव राऊत आदी उपस्थित होते.

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : येथील प्रसिध्द कंत्राटदार तथा सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी भागवत किशनराव खोडके पाटील यांचे शनिवारी (दि.29) सकाळी तेलंगणातील श्रीशैलम जवळ एका रस्ते अपघातात निधन झाले. मृत्यूसमयी ते 66 वर्षांचे होते. मुंबई येथील पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे व त्यांचे सहकारी भागवत खोडके हे त्यांच्या वाहनाने देवदर्शनाकरीता निघाले होते. तेलंगणातील श्रीशैलमजवळ एका बसने दिलेल्या जोरदार धडकेत खोडके हे जागीच मृत्यूमुखी पडले तर त्यांचे सहकारी डॉ. पठारे हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरु असतांना त्यांचेही निधन झाले. या अपघातात कार चालक बचावला. दरम्यान, खोडके पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील शेवगाव खोडके येथील मूळ रहिवाशी होत. ते परभणीत वास्तव्यास होते. येथील नामवंत कंत्राटदार…

Read More

परभणी (प्रतिनिधी) कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार समिती आणि कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार ठाणे येथील निराधार, निराश्रित, मनोरुग्णांची आई स्मित फाउंडेशनच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या योजना घरत यांना मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२८) प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते. यावेळी सत्कारमूर्ती कृषीभूषण कांतराव काका झरीकर, उपाध्यक्ष अ‍ॅड.किरणराव सुभेदार, संचालक मंगेशराव सुभेदार,पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष . बाळासाहेब जामकर, पुरस्कार समितीचे सचिव विजय जामकर, समितीचे सहसचिव एकनाथ मोरे,अ‍ॅड.अशोक सोनी, सौ.दीपलक्ष्मीताई जामकर, सौ.संध्याताई जामकर,सौ.सोनियाताई जामकर, सौ.वसुंधराताई जामकर, मेघाताई देशमुख, सौ.नेहाताई जामकर, सौ.कविताताई सुभेदार, सौ.प्रतिमाताई देशमुख, रागिणी…

Read More

पालम (प्रतिनिधी) ) तालुक्यातील पेठशिवणी येथील श्री बसवेश्वर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वेदिका गजानन कामटकर हिची केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेशासाठी ग्रामीण विभागातून निवड झाली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक प्रशांत करंजे यांनी दिली. केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2025 मधून इयत्ता 6 वी प्रवेशासाठी परभणी जिल्ह्यातून या विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिने यश संपादन केले आहे.या विद्यार्थिनीस श्री राजपाल दुर्गे सर व गजानन थाडगे, संग्राम ढगे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शाळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याची माहिती नागनाथ खेडकर सर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळींनी अभिनंदन केले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री गायकवाड…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : दोन लाख रुपयांची लाच स्विकारणार्‍या वादग्रस्त जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर व क्रिडा अधिकारी नानकसिंह बस्सी या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने गुरूवारी ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.28) या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे. क्रिडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पुलाच्या बांधकामासह या स्विमिंग पुलावर 2024 साली आयोजित केलेल्या क्रिडा स्पर्धांच्या एकूण 95 लाख रुपयांचे थकीत बिल मिळावे यासाठी तक्रारकर्त्याने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु केला, परंतु प्रत्येकवेळी जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांनी जाणिवपूर्वक त्रुटी काढल्या. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने या थकीत बिलांच्या मंजूरीकरीता क्रिडा अधिकारी बस्सी व जिल्हा क्रिडा…

Read More