परभणी,(प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने बालगोपाळांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजविण्यासाठी विश्व हिंदू परिषद, परभणीच्या वतीने गेल्या 48 वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी भव्य गोपाळ दिंडी यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. शनिवार 25 जुलै रोजी सकाळी 8 वाजता माळी वेस येथील हनुमान मंदिरातून दिंडीला प्रारंभ होणार असून शहरातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात. त्याच परंपरेचा संस्कार बालकांवर व्हावा, या उद्देशाने परभणीत ‘प्रति पंढरपूर’ उभारण्याचा उपक्रम विश्व हिंदू परिषद गेल्या चार दशकांहून अधिक काळ सातत्याने राबवत आहे. या दिंडीत संत परंपरा, वारकरी संस्कृती, भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन…
Author: Lok Sanchar
पाथरी,(प्रतिनिधी) : देशभरात नीट परीक्षेशी संबंधित तणावामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार 24 जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडत असून त्यामुळे शिक्षण व्यवस्थेबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनांच्या निषेधार्थ नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीनेही मोर्चा…
परभणी (प्रतिनिधी) वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी बहिरेपणाच्या समस्येने ग्रासलेल्या तरुणाची श्रवण शक्ती परभणीच्या आर.पी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे परत मिळाली. परभणी येथील हा तरुण बऱ्याच दिवसांपासून कानातून पू व पाणी येणे, सतत कान दुखणे आणि हळूहळू ऐकू येणे, आयकू कमी येणे व नंतर काहीही न ऐकू येणे या त्रासाने त्रस्त होता. दुर्बिणीतून (Endoscopy) कानाची तपासणी केल्यानंतर प्राथमिक समस्या स्पष्ट झाल्या. श्रवण क्षमता तपासणीसाठी ऑडिओमेट्री विभागात तपासणी दरम्यान रुग्णाला फक्त १०% ऐकता येत असल्याचे निष्पन्न झाले. वयाच्या विशी-पस्तिशीतच आलेल्या या गंभीर आजारामुळे आणि उपचारांच्या वाढत्या खर्चाला कंटाळून रुग्ण परभणीसह विविध बाहेरील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी फिरत होता; परंतु त्याला कुठेही…
जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी,(प्रतिनिधी) शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट, सुलभ आणि प्रभावीपणे पोहोचविणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ हे शासनाचे लोकाभिमुख पाऊल आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचत असून प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवून त्यांचे समाधान साधले जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आज समाधान शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उदघाटन पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या…
परभणी, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “देवा भाऊ कृषी माऊली सोहळा” आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथे १५० शहरी महिलांना बागकाम व भाजीपाला लागवडीसाठी कृषी किटचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या डॉ. मीनाताई परतानी या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीभाऊ भरोसे, शहर जिल्हा महामंत्री श्री. भालचंद्रजी गोरे, लताताई वाकळे, सौ. मीनाताई वडपुरकर, सौ. तिरुमला खिलारे, नगरसेविका सौ. सुशीलाताई थोरात, नगरसेविका सौ. सपनाताई जुक्टे, सौ. गिरीजा अजेगावकर, डॉ. मंजुषा नरवाडकर, सीमाताई धुमाळ, सौ. प्रभावती अन्नपूर्णे, सौ.…
परभणी, (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी ९.०० वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात १८ ते ७० वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत नोंदणी करण्यात येणार असून, रुपये २ लाखांचा अपघाती विमा संरक्षण पुर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा विमा महसूल विभागाच्या पुढाकाराने काढण्यात येणार आहे. या विशेष शिबिराचा लाभ जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी घ्यावा, तसेच संबंधित बँकांचे सर्व खातेदार आणि १८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 लाख रुपयांच्या कथित जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत छडा लावत हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असा सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतूर येथील दहिवाल ज्वेलर्समध्ये काम करणारा प्रथमेश शहाणे याने बुधवारी (दि. 22) परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुकानमालकाने बँकेत जमा करण्यासाठी दिलेली 7 लाख रुपयांची रक्कम घेऊन तो परभणीकडे येत असताना जळगाव परिसरात चार अज्ञात…
परभणी,(प्रतिनिधी) : देवाभाऊ रजत योजना म्हणजे पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या अंत्योदयापर्यंत विकास संकल्पनेचाच प्रयत्न होय, असे मत राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘देवाभाऊ रजक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात बुधवार 22 जूलै रोजी नक्षत्र प्रताप नगर चौक येथील सभागृहात सकाळी नऊ वाजता करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 20 धोबी बांधवांना आधुनिक स्टीम आयर्निंग टेबलचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार परिणय फुके, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कवठेकर, नागपूर शहराध्यक्ष दयानंद तिवारी, मुख्यमंत्री कार्यालयातील…
परभणी, (प्रतिनिधी) : नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनातुन संसदेवर काढलेल्या मोर्चा दरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदच्या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने सकाळी शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. व्यापारी, प्रतिष्ठानचालक आणि दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्या आवाहनास व्यापार्यांनी जोरदार प्रतिसाद दिला व व्यापारीपेठा बंद ठेवल्या. तसेच विविध शैक्षणिक संस्थांनीसुध्दा शाळा बंद ठेऊन या आंदोलनास प्रतिसाद दिला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील युवा कुस्तीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते पैलवान संतोष उर्फ अमोल सोनाजी मोरे यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या परभणी जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांनी नुकतीच ही घोषणा केली. पैलवान मोरे यांनी कुस्ती क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी परभणी येथे जगदंब कुस्ती संकुल उभारण्याचा संकल्प साकारत जिल्ह्यातील पारंपरिक कुस्तीला नवी दिशा देण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निकाली कुस्त्यांच्या भव्य मैदानांचे आयोजन केले जाते. तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी उपक्रम सातत्याने राबविण्यात…

