परभणी (प्रतिनिधी) कृषी क्षेत्रासाठीचे एआय तंत्रज्ञान धोरण केवळ कागदोपत्री न ठेवता या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अर्थ संकल्पात भरीव निधी देणे आवश्यक आहे. त्यानंतरच एआय तंत्रज्ञान अंतर्गत ड्रोन, रोबोटीक तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकºयांच्या बांधावर पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे यासाठी भरीव निधी आणि ठोस अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. राज्यातील शक्तिपीठ व समृध्दी या दोन महामार्गासाठी शासन हजारो कोटींचा निधी खर्च करीत आहे. परंतू कृषी क्षेत्राकडे शासनाचे संपूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे म्हणजे पांढरा हत्ती पोसल्यासारखे झाले असल्याचे बोलले जात असून यामुळे विद्यापीठांची बदनामी होत आहे. या कृषी विद्यापीठातून कुठलेही संशोधन होत…
Author: Lok Sanchar
जगात काही माणसं अशी असतात की ज्यांच्या जीवनसंघर्षातून घडलेली प्रेरणादायी यशोगाथा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरते. असेच आमच्या शारदा महाविद्यालयातून अठ्ठावीस वर्षाची सेवा देऊन निवृत्त होत असलेले कार्यालयीन अधीक्षक श्री सुरेश नारायणराव जयपूरकर… त्यांचे मुळ गाव जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील जयपूर एक शेतकरी कुटुंब. कोरडवाहू निसर्गावर आधारित शेती त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची.आई अशिक्षित व वडीलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण.परंतु कुटुंबातील वडिलांचे भाऊ उच्चशिक्षित होते. कुटुंबात तीन बहिणी १मोठी व २ लहान आणि स्वतः अशी चार भावंडे. तीन बहिणीमध्ये एकुलता एक भाऊ म्हणून जबाबदारीची जाणीव लहानपणापासूनच. अशा परिस्थितीत जन्माला आलेले सुरेश जयपूरकर यांनी आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी मात्र मोठी ठेवली. जयपूर येथील जिल्हा…
परभणी (प्रतिनिधी) बाल विद्या मंदिर हायस्कूल विभागांमध्ये आज दिनांक 26.02 2026 रोजी संस्थेचे सन्माननीय सचिव मा. डॉ. विवेक नावंदर यांच्या शुभहस्ते आयुका, पुणे येथे विज्ञान वारीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा, एन एस ओ ऑलंपियाड स्पर्धा परीक्षा व पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे आयोजित प्रेरणा उत्सव मध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्था सचिव मा. डॉ. विवेक नावंदर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार प्रशालेचे पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पंडित, विज्ञान शिक्षिका जयश्री महामुने, गजानन जुमडे व महेश फड, गजानन लोणसने व कलाध्यापक केशव लगड यांची उपस्थिती होती.…
परभणी (प्रतिनिधी) मानवी हक्क अभियान च्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा रामदास आठवले साहेबांना मानवी हक्क अभियान च्या वतीने महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांपासून दलित आदिवासी समाजाने गायरान जमिनीवर अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह करित आहेत शासनाचे अनेक परिपत्रक निघूनही स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा उलट अर्थ काढून महाराष्ट्र शासन दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी निष्कासित करून त्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी व ईतर कारखानदारांच्या घशात घालण्याचा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरत दलित आदिवासी यांच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी नांवे करून 7/ 12 मालकी…
पेडगाव ता.परभणी येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिरात केले प्रतिपादन . परभणी (प्रतिनिधी) मा कुलगुरू इंद्रमणी यांचे मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेद्वारे पेडगाव ता.जि. परभणी येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात परिसरातील संत्रा, कागदी लिंबू, केळी व भाजीपाला उत्पादक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया, जैविक खते आणि सेंद्रिय खते , विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त खते या निविष्ठांचा एकात्मिक खत व्यवस्थापन यासाठी वापर करण्यासंदर्भात डॉ. हरिहर कौसडीकर,उपसंशोधन संचालक आणि विभाग प्रमुख…
परभणी (प्रतिनिधी) शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मंगळवारी अभाविपचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरात महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) परभणी शाखेचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा यशस्वीपणे पार पडला. विविध आयटीआय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा केवळ निदर्शन नसून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाला जागे करण्याची ठाम आणि तीव्र हाक होती. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी बॅनर-फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. “उठ दोस्ता उगार मुठ… तूच थांबव तुझ्या शिक्षणाची लूट!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर करण्यात आलेल्या निवेदनात…
विविध शैक्षणिक मागण्यांसाठी अभाविपचे आंदोलन परभणी ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांसाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी “विद्यार्थी आक्रोश मोर्चा_ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाभरातून विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. अभाविपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे की, राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती, शुल्कवाढ, वसतिगृह, वाहतूक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम करत असल्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, आर्थिक व प्रशासकीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासन व संबंधित प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने…
फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा नियोजन बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू: (प्रतिनिधी) शहरातील मयुरी पार्क येथे ज्ञानेश्वरी ग्रंथास ७५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त ११ मार्च ते १९ मार्च पर्यंत आयोजित होणारा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचे उत्तम नियोजन होत आहे. हा सांगता सोहळा सेलूच्या परंपरेला साजेसा सुंदर साजरा करू, सोहळ्यास कशाचीही कमतरता भासणार नाही. असा अश्वासक शब्द फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा नियोजन बैठकीत पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर – साकोरे यांनी दिला. शहरातील बालाजी मंदिरातील सिंदूर सभागृहात बुधवार ( दि. ११ ) रोजी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा नियोजन बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नामदेव महाराज ढवळे हे होते.…
परभणी (प्रतिनिधी) १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान मृद विज्ञान विभागातर्फे भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली पुरस्कृत तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठ वर डॉ अनिल धमक, डॉ रामप्रसाद खंदारे, डॉ.संतोष चिक्षे,डॉ स्वाती झाडे, डॉ. सुरेश वाईकर यांची उपस्थिती होती. माननीय डॉ. इंद्र मणी, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या प्रेरणेतूनभा रतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि कृषी महाविद्यालय परभणी अंतर्गत मृद विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माती परीक्षण आणि रासायनिक खतांचा वापर या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे संपन्न झाले . प्रशिक्षणार्थीना आज व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचेकडून प्रमाण पत्र वितरण केले. याप्रसंगी…
परभणी (प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांचे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिंतूर तालुक्यातल्या गणेशपुर जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये दुःखद निधन झाले त्यांना आज दि 5 रोजी परभणी येथे अतिथी हॉटेल येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली स्टेडियम परिसरातील अतिथी हॉटेल येथे सकाळी बारा वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते यावेळी सुरुवातीला नितीन धूत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर अनेक पत्रकारांनी त्यांच्या सोबतच्या आठवणी यावेळेस व्यक्त केल्या त्यानंतर दोन मिनिटं स्तब्ध राहून नितीन धूत यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते

